Navneet Rana : नवनीत राणा, हे राजकारण आहे, सी ग्रेड चित्रपट नाही, मनिषा कायंदेंचा राणांना त्या व्हिडिओवरून इशारा

आता नवनीत राण यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नवनीत राणा, हे राजकारण आहे, सी ग्रेड चित्रपट नाही, असा थेट इशारा शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी दिला आहे. तर महापौर किशोरी पेडणेकर यांनीही राणा यांचा जोरदार समाचार घेतला आहे.

Navneet Rana : नवनीत राणा, हे राजकारण आहे, सी ग्रेड चित्रपट नाही, मनिषा कायंदेंचा राणांना त्या व्हिडिओवरून इशारा
नवनीत राणा यांना मनिषा कायंदे यांचा इशाराImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 6:52 PM

मुंबई : राज्यात आधी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांची अटक आणि आता मुंबई पोलिसांनी ट्विट केलेला व्हिडिओ सध्या चांगलाच गाजत आहे. नवनीत राणा यांनी थेट केंद्रापर्यंत तक्रार करत मला पोलीस कोठडीत (Ravi Rana) योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. मात्र त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने आले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला या प्रकरणात केंद्राने अहवालही मागवला. मात्र मुंबई पोलिासांनी शेअर केलेल्या त्या व्हिडिओने ट्विस्ट आणले, ज्यात नवनीत राणा आणि रवी राणा हे पोलीस ठाण्यात निवांत बसून चहा पिताना दिसून येत आहे. त्यानंतर मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार पलटवार केला. आता नवनीत राण यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नवनीत राणा, हे राजकारण आहे, सी ग्रेड चित्रपट नाही, असा थेट इशारा शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी दिला आहे. तर महापौर किशोरी पेडणेकर यांनीही राणा यांचा जोरदार समाचार घेतला आहे.

मनिषा कायंदे यांचा राणा यांना इशारा

मनिषा कायंदे यांनी टीका करत ट्विट केले आहे की, नवनीत राणा, हे राजकारण आहे, सी ग्रेड चित्रपट नाही, याचे भान राखा. दुसऱ्याने लिहून दिलेले स्क्रिप्ट वाचुन नाटक करणे हे तुमच्या चित्रपटात ठीक होते, आता भानावर या, अन्यथा शिवसेनेच्या रणरागिणी तुम्हाला ताळ्यावर आणतील. असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, लाज वाटायला हवी नवनीत राणा यांना. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी करतांना सरकारी चहाशी तरी इमान राखायचे. अर्थात तुमच्याकडून कसली अपेक्षा करावी? असा सवालही त्यांनी केला आहे.

मनिषा कायंदे यांचं ट्विट

किशोरी पेडणेकर यांचाही जोरदार हल्लाबोल

राणा दाम्पत्य यांचे सगळे आरोप खोटे आहेत. हे स्वतः मुंबई पोलिसांचे कमिशनर संजय पांडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. हनुमान जयंती पासूनचा जो त्यांनी थयथयाट सुरू केला आहे, त्याचा हा खरतर परिणाम आहे. आमचं कोणाशीही टोकाचं वैर नाही. राणा दाम्पत्यांना केंद्राकडून सर्व रसद पुरवली जात आहे. जेलमध्ये कधीच जाती-पातीचे राजकारण हे होत नाही तिथे सर्व कैद्यांना समान वागणूक दिली जाते हे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मनातून वाटत असेल, असे म्हणत पेडणेकर यांनीही नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.