समीर वानखेडेंनी ‘त्या’ भेटीचं वृत्त फेटाळलं, मलिकांकडून थेट पुरावाच सादर

मालदीव आणि दुबईतील फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून NCB च्या वसुलीबद्दल नवाब मलिकांनी गंभीर आरोप केले होते. मलिकच्या आरोपांवर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले की, नवाब मलिक खोटारडे आहेत आणि वानखेडे मालिकांवर या प्रकरणी कायदेशीर कारवाई करतील. त्यानंतर नवाब मलिकांनी ट्विट करत थेट पुरावेच सादर केलेत.

समीर वानखेडेंनी 'त्या' भेटीचं वृत्त फेटाळलं, मलिकांकडून थेट पुरावाच सादर
समीर वानखेडे, नवाब मलिक
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 9:12 PM

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर निशाणा साधत असून, क्रूझवरच्या कारवाईवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी ट्विट करत पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर निशाणा साधलाय. समीर वानखडे यांनी मालदीवला भेट दिली होती हे मान्य केले आहे, पण त्यांनी दुबईला भेट दिल्याचं नाकारलं. त्यांच्या बहिणीसोबत त्यांच्या दुबई भेटीचा हा पुरावा आहे. समीर वानखेडे 10 डिसेंबर 2020 रोजी दुबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होते. त्यांचे खोटे आता उघड झालेय, अशी माहिती ट्विट करत नवाब मलिकांनी दिलीय.

नवाब मलिकांकडून थेट पुरावेच सादर

मालदीव आणि दुबईतील फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून NCB च्या वसुलीबद्दल नवाब मलिकांनी गंभीर आरोप केले होते. मलिकांच्या आरोपांवर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले की, नवाब मलिक खोटारडे आहेत आणि वानखेडे मलिकांवर या प्रकरणी कायदेशीर कारवाई करतील. त्यानंतर नवाब मलिकांनी ट्विट करत थेट पुरावेच सादर केलेत.

नवाब मलिकांचे नेमके आरोप काय?

कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. दरम्यान, मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. याचे पुरावे नवाब मलिक यांनी सादर केले आहेत. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? याचं उत्तर अपेक्षित आहे, असेही नवाब मलिक म्हणाले होते.

मालदीवमध्ये माझी कोणाशीही भेट झालेली नाही

“मालदीवमध्ये माझी कोणाशीही भेट झालेली नाही. मागील पंधरा दिवसांपासून माझ्या परिवारावर आरोप करत करण्यात येत आहेत. एका मृत महिलेवर टीका केली जात आहे. एका मुलाची आई असलेल्या महिलेचे इन्स्टाग्राम चेक करुन जासुसी केली जात आहे. 77 वर्षाच्या निवृत्त झालेल्या माणसावर बोललं जात आहे. मी दुबईत गेलो नाही. मुंबईतील फोटो ट्विट करुन दुबईला गेल्याचा आरोप केला जात आहे. हा साफ खोटारडेपणा आहे,” असे प्रत्युत्तर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दिलेय.

संबंधित बातम्या :

‘एकच व्यक्ती भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडतेय, दुसरं काही महाराष्ट्रात होत नाही’ संजय राऊतांचा सोमय्यांना टोला

मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये एअरफोर्सचं ट्रेनी विमान क्रॅश! विमान जमिनीत रुतलं, पायलट जखमी

nawab malik criticized on sameer wankhede on dubai visit

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.