राजीनामा तुमच्या बापालाही घ्यावा लागेल, सुधीर मुनगंटीवार कडाडले
आमचं बोध चिन्ह फ्लॉवर आहे. अब फ्लॉवर नही, फायर होगा. उसमे सब पापी जल के राख होंगे, असं सांगतानाच नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही म्हणता, राजीनामा तुमच्या बापाला घ्यावा लागेल. या जनतेसमोर तुमची औकात काय आहे?
मुंबई: आमचं बोध चिन्ह फ्लॉवर आहे. अब फ्लॉवर नही, फायर होगा. उसमे सब पापी जल के राख होंगे, असं सांगतानाच नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही म्हणता, राजीनामा तुमच्या बापाला घ्यावा लागेल. या जनतेसमोर तुमची औकात काय आहे?; अशा शब्दात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी ठणकावले. या महाराष्ट्रातील 2 कोटी 30 लाख मतदारांनी भाजपला (bjp) मतदान केलं. तुम्ही बेईमानी केली. कर्ण आणि दुर्योधन एकत्र येऊन पांडवा विरुद्ध षडयंत्र करत होते. आताही तेच सुरू आहे. कर्ण त्यांच्यासोबत आहे. आमच्याविरोधात षडयंत्र सुरू आहे. पण याद राखा. लोकशाहीच्या मार्गाने आमचे कार्यकर्ते तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आझाद मैदानात विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांच्या राजीनाम्यासाठी हा मोर्चा आयोजित केला होता. यावेळी मोर्चाला संबोधित करताना मुनगंटीवार यांनी हा इशारा दिला.
सत्ताधाऱ्यांनी नवाब मलिकांच्या बाजूने शक्ती उभी केली. त्याविरोधात शंखनाद करायला आपण आलो आहोत. या दळभद्री सरकारपासून महाराष्ट्राला मुक्त करायचं हा आपला संकल्प आहे, जे सरकार दाऊदचं मित्रं बनून काम करतं आहे. त्या सरकारला घालवायचं आहे. रणरणत्या उन्हात सूर्याला साक्षी ठेवून या दळभद्री सरकारला, मद्य विकणाऱ्या सरकारला नेस्तनाबूत करू. हे युद्ध आहे. हे युद्ध धर्म आणि अधर्माचं आहे. एकीकडे धर्माची बाजू घेणारे आणि दुसरीकडे नवाब मलिकांची बाजू घेणारे अधर्मी लोक आहेत. पिओ वाईन आणि रहो फाईनचा नारा देणारे लोक आहेत. आतंकवाद्याची जमीन घेणाऱ्या मलिकांना खुर्चीच्या प्रेमापोटी खुर्ची सम्राट वाचवत आहेत, अशी घणाघाती टीकाही नवाब मलिक यांनी केली.
खुर्चीची चिंता नाही
दहशतवाद आणि आतंकवादाच्या घटनेत ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे, ज्यांना पैसे पुरवण्याचं काम, ज्यांची जमीन घेण्याचं काम ज्यांनी केलं अशा लोकांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही. आम्हाला खुर्चीची चिंता नाही. राज्यात आतंकवादाला पोषण देण्याचं काम करतात त्यांच्याविरोधात लढण्याचं काम आम्ही काम करतो, असंही ते म्हणाले.
12 तारखेचा योगायोग
यावेळी त्यांनी मुंबईतील बॉम्बस्फोटावरूनही घणाघाती टीका केली. 12 मार्चला काय योगायोग माहीत नाही. घटना 12 मार्चची. 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. त्या मुख्यमंत्र्यांचा जन्म दिवसही 12 तारखेचा. आमदार विधानपरिषदेचे 12 करा यासाठी आग्रह. महाराष्ट्राचे 12 वाजले तरी चालतात पण 12 मार्चला मुख्यमंत्री काय सांगतात 12 ठिकाणी नाही 13 ठिकाणी घटना झाल्या. ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात ते सांगतात मशीद बंदरमध्ये कल्पोकल्पित घटना घडल्याचं सांगितलं. मी खोटं बोललो. त्यांना निरापराधाच्या मृत्यूची चिंता नव्हती, विधवांची चिंता नव्हती, अनाथांची चिंता नव्हती. चिंता होती फक्त मतांची. या घटनेनंतर मतांचं ध्रुवीकरण झालं तर मुंबईतून एकच आवाज उठेल. काँग्रसे हटाव आणि देश बचावचा नारा उठेल. म्हणून ते खोटं बोलले, असा हल्ला त्यांनी चढवला.
संबंधित बातम्या:
MNS : लढायचं ते जिंकण्यासाठी, राज ठाकरे मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यात नेमकं काय बोलणार?
फडणवीसांच्या गंभीर आरोपानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब? कार्यालयालाही टाळं!
मालेगावात व्यावसायिकाच्या ऑफिसमधून 21 लाखांची चोरी, चोरांच्या सुळसुळाटाने नागरिक हैराण