आधी सूचक ट्विट, नंतर जाहीर आरोप, आता समीर वानखेडेंना डच्चू, ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यात मलिक यांना यश ?

मलिक यांच्या आरोपानंतर वानखेडे यांच्यावर संशयाने पाहिले जात असताना एनसबीने त्यांच्याकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरण तसेच इतर पाच केसेसचा तपास काढून घेतला आहे. वानखेडे यांच्याविरोधात करण्यात आलेली ही कारवाई म्हणजे मलिक यांना यश मिळाल्याचे म्हटले जात आहे.

आधी सूचक ट्विट, नंतर जाहीर आरोप, आता समीर वानखेडेंना डच्चू, 'करेक्ट कार्यक्रम' करण्यात मलिक यांना यश ?
मलिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचा भाजपचा दावा
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 8:46 PM

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. या आरोपांनंतर वानखेडे अडचणीत सापडलेले असून एनसीबीने मोठा निर्णय घेतलाय. मलिक यांच्या आरोपानंतर वानखेडे यांच्यावर संशयाने पाहिले जात असताना एनसबीने त्यांच्याकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरण तसेच इतर पाच केसेसचा तपास काढून घेतला आहे. वानखेडे यांच्याविरोधात करण्यात आलेली ही कारवाई म्हणजे मलिक यांना यश मिळाल्याचे म्हटले जात आहे.

आर्यन खानला अटक म्हणजे बॉलिवूडला बदनाम करण्याचा कट

क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले. राज्यातील नशाखोरीचा नायनाट करणारा नायक म्हणून त्यांच्याकडे लोक पाहू लागले. त्यांनी केलेली धडाडीची कारवाई पाहून सगळेच प्रभावित झाले होते. मात्र या कारवाईनंतर मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गोष्टी उजेडात आणल्या. त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. मलिक यांनी सुरुवातील क्रूझ रेव्ह पार्टीवर एनसबीने केलेल्या कारावाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर त्यांनी आर्यन खानची अटक म्हणजे बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी रचण्यात आलेला कट असल्याचा आरोप केला.

नवाब मलिक यांच्याकडून आरोपांच्या फैरी

तसेच पुढे नवाब मलिक यांनी आपला मोर्चा थेट एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडे वळवला. मलिक रोज एक एक सूचक ट्विट करून वानखेडे यांच्यावर वेगवेगळे आरोप करत होते. त्यांनी वानखेडे यांनी आपला धर्म लपवून चुकीचे जात प्रमाणपत्र दावखून मागासवर्गीयांची नोकरी बळकावल्याचाही दावा केला. हा आरोप करताना त्यांनी वानखेडे यांची काही कथित कागदपत्रेदेखील सर्वजनिक केले. वानखेडे यांच्या या आरोपानंतर मात्र एनसीबीचे धाबे दणाणले. समीर वानखेडे यांच्याकडे नंतर संशयाने पाहिले जाऊ लागले. आर्यन खानची अटक म्हणजे दुसरा कट होता का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. तसेच वानखेडे यांनी खरंच चुकीची कागदपत्रे सादर केली का ? याचादेखील तपास व्हावा अशी मागणी केली जाऊ लागली.

मलिकांना यश, समीर वानखेडे यांना जबर धक्का

मलिक यांनी गंभीर आरोप केल्यानंतर एनसीबीच्या दिल्ली येथील मुख्यालयातून सूत्रे हालली. एनसीबीने वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू केली. त्यासाठी एनसीबीने एसआयटीची स्थापना केली. तर दुसरीकडे वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने अभ्यास करणे सुरु केले आहे. तसेच आता एनसीबीने वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरण तसेच इतर पाच प्रकरणांचा तपास काढून घेण्याचा निर्णय घेतला. एनसीबीचा हा निर्णय म्हणजे वानखेडे यांना मोठा धक्का तर दुसरीकडे मलिक यांना मिळालेले यश असल्याचे म्हटले जात आहे.

इतर बातम्या :

Aryan Khan drugs case | ”आरोप झाले मग त्या अधिकाऱ्याला बदलायचं हा वाईट मेसेज जाणार

आर्यन खान प्रकरणाचा तपास संजय सिंग यांच्याकडे, कोण आहेत संजय सिंग?

Aryan Khan drugs case | समीर वानखेडेंच्या ‘त्या’ 5 चुका, ज्यामुळे त्यांना आर्यन खान प्रकरणातून हटवलं; वाचा सविस्तर

(ncb officer sameer wankhede removed from aryan khan drug case probe nawab malik became successful)

बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.