मलिकांनी वानखेडेंचे दुबईला गेल्याचे फोटो ट्विट केले, आता समीर वानखेडे म्हणाले, साफ खोटारडेपणा !
77 वर्षाच्या निवृत्त झालेल्या माणसावर आरोप केला जात आहे. मी दुबईत गेलो नाही. मुंबईतील फोटो ट्विट करुन दुबईला गेल्याचा आरोप केला जात आहे. हा साफ खोटारडेपणा आहे," असे प्रत्युत्तर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दिले आहे.
मुंबई : “मालदीवमध्ये माझी कोणाशीही भेट झालेली नाही. मागील पंधरा दिवसांपासून माझ्या परिवारावर आरोप करत करण्यात येत आहेत. एका मृत महिलेवर टीका केली जात आहे. एका मुलाची आई असलेल्या महिलेचे इन्स्टाग्राम चेक करुन जासुसी केली जात आहे. 77 वर्षाच्या निवृत्त झालेल्या माणसावर बोललं जात आहे. मी दुबईत गेलो नाही. मुंबईतील फोटो ट्विट करुन दुबईला गेल्याचा आरोप केला जात आहे. हा साफ खोटारडेपणा आहे,” असे प्रत्युत्तर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दिले आहे.
निवृत्त झालेल्या वडिलांवर आरोप केले जात आहेत
वानखेडे यांनी मलिक यांना सडेतोड उत्तरे दिले. “मागील पंधरा दिवसांपासून माझ्या परिवारावर आरोप केले जात आहेत. मी एक छोटा सरकारी नोकर आहे. देशसेवा करण्यासाठी जर तुरुंगात टाकले जात असले तर माझी हरकत नाही. एक छोटे मुल असलेल्या आईची जासुसी केली जात आहे. माझ्या मृत आईवर टीका करण्यात येत आहेत. तसेच 77 वर्षाचे असलेले तसेच निवृत्त झालेल्या माझ्या वडिलांवरदेखील टीका केली जात आहेत. या सर्व प्रकाराची मी कठोर शब्दात निंदा करतो. मुंबईतील फोटो ट्विट करुन दुबईत असल्याचे सांगितले जात आहे,” असे समीर वानखेडे म्हणाले.
‘देशसेवेसाठी जेलमध्ये टाकत असतील तर स्वागत करतो’
तसेच “वारंवार गेल्या 15 दिवसांपासून माझी मृत आई, माझे निवृत्त वडील आणि बहिणीवर घाण शब्दांमध्ये टीका केली जात आहे. मी या गोष्टीचं खंडण करतो. ते खूप मोठे मंत्री आहेत. त्यांना लोकांचा अपमान करण्याचा कदाचित अधिकार असू शकतो. पण मी खूप लहान सरकारी कर्मचारी आहे. मी माझं काम करतोय. जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अँटीड्रग्ज ऑपरेशन करण्यावरुन जेलमध्ये टाकत असतील तर मी त्याचं स्वागत करतो”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
समीर वानखेड मालदीव, दुबईमध्ये होते
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर खंडणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. कोरोनाकाळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते. मीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? असा सवाल मलिक यांनी केला होता.
इतर बातम्या :
IPL 2022 मध्ये कोणते 3 खेळाडू मुंबई इंडियन्स करणार रिटेन?, दोन मॅच विनर्सचं भविष्य धोक्यात
नवाब मलिक म्हणाले, समीर वानखेडेची नोकरी जाणार, जेलमध्ये टाकणार, आता वानखेडेंचं थेट उत्तर
(NCB zonal director denied all allegations made by nawab malik said photo of mumbai are said that taken in dubai)