उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच अजितदादांना मोठा धक्का; बड्या नेत्यानं सोडली साथ, राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे, आणकी एका शिलेदारानं साथ सोडली आहे.

उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच अजितदादांना मोठा धक्का; बड्या नेत्यानं सोडली साथ, राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश
अजित पवार आणि शरद पवार
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 4:55 PM

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. वीस नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यावेळी ही निवडणूक महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशीच होणार आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन ते अडीच वर्षांमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यामुळे दोन्ही कडील नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. भाजपकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, भाजप वगळता महायुती आणि महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षानं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाहीये, यादी जाहीर होताच इच्छुकांची बंडखोरी टाळण्याच मोठं आव्हान सर्वच पक्षांसमोर असणार आहे. या सर्वांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

मुंबईमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. मुंबई राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी अजित पवार यांची साथ सोडली आहे. त्यांनी नुकतीच वाय. बी चव्हाण येथे शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांचा आणखी एक शिलेदार शरद पवार यांच्या गळाला लागला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता, महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीची वाट धरल्याचं पाहायला मिळत आहे, अजित पवार गटातून काही नेत्यांनी यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तर आता मुंबई राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी देखील अजित पवार यांची साथ सोडली आहे, हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.