लोकसभेत नणंद-भावजय लढत रंगली, आता विधानसभेत भाग्यश्री अन् धर्मराव बाबा आत्राम अशी बाप-बेटी लढत रंगणार, शरद पवार गटात प्रवेश करताच मुलीचे बापाला थेट आव्हान…

आम्हाला कुणी हात धरून शिकविले नाही. आता मला संधी द्या, मी त्या संधीचे सोने करेन. माझ्यासोबत जनता आहे. परंतु आता माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या मिळत आहेत. परंतु ते शेर आहेत तर मी शेरनी आहे, माझ्या कार्यकर्त्याना हात लावू नका, कापून टाकीन, असे थेट आव्हान मुलीने बापाला दिले.

लोकसभेत नणंद-भावजय लढत रंगली, आता विधानसभेत भाग्यश्री अन् धर्मराव बाबा आत्राम अशी बाप-बेटी लढत रंगणार, शरद पवार गटात प्रवेश करताच मुलीचे बापाला थेट आव्हान...
dharmarao baba atram and bhagyashree
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 11:14 AM

लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकाच परिवारात लढत झाली. सुप्रिया-सुळे आणि सुनेत्रा पवार अशी पवार कुटुंबातील नणंद-भावजय यांच्यात लढत झाली. आता विधानसभेतही एकाच परिवारातील नव्हे तर बाप-बेटीत लढत रंगणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार समर्थक मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री हलगेकर आत्राम यांच्यात लढत होण्याची चिन्ह निर्माण झाले आहे. भाग्यश्री यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन वडील धर्मराव बाबा आत्राम यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. यामुळे येत्या विधानसभेत पित्याविरुद्ध कन्येची लढत पाहायला मिळणार आहे. त्यास स्वत: भाग्यश्री यांनीही दुजोरा दिला.

पवार साहेबांनी काही घर फोडले नाही

भाग्यश्री आत्राम म्हणाल्या की, शरद पवार साहेबांनी काही घर फोडले नाही. बाबांसोबत माझे पटत नव्हते, त्यामुळे मी शरद पवार गटात गेली. आता विधानसभा निवडणुकीत उतरणे माझे निश्चित झाले आहे. राजकारणात तुम्ही अनेक लढती पाहिलेल्या आहेत, पण आता ही लढत बघाल. महाविकास आघाडीत अहेरी विधानसभेवर काँग्रेसकडून दावा केला जात आहे. त्यावर भाग्यश्री आत्राम यांनी म्हटले, जागा मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. परंतु कोणत्या पक्षाला कोणती जागा सोडावी, हा निर्णय वरिष्ठ नेते घेतली.

बाबा आत्राम यांनी माझ्या मुली आणि जावाईला नदीत फेका असे वक्तव्य केले होते, त्यावर प्रतिक्रिया देताना भाग्यश्री आत्राम म्हणाल्या, बाबांचे हे वक्तव्य म्हणेज मी माझ्यासाठी आशीर्वाद समजते. त्यांनी हे वक्तव्य केले तेव्हा मंचावर महिला आयोगाच्या अध्यक्षाही होत्या. त्यानंतरही बाबांनी असे वक्तव्य करणे मला योग्य वाटले नाही.

हे सुद्धा वाचा

आरोपींना तुम्ही कंपनीत संचालक केले?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करताना भाग्यश्री आत्राम यांनी सुरुवातीला स्व. आई आणि धर्मरावबाबा आत्राम यांना चरण स्पर्श असा उल्लेख केला. वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, आज निसर्ग कोपला आहे, अन्यथा अधिक मोठा कार्यक्रम झाला असता. या क्षेत्रात विकास झालेला नाही. मंत्री आत्राम यांना वेळ नाही, म्हणून त्यांनी मला फिरविले. त्यांनी मला आश्वासन दिले, गाजर दिले. त्यांनी कंपनी उघडली, ते पण गाजर आहे. त्यांना रोजगार द्यायचा होता तर आधीच्या खाण प्रकल्पात का नाही दिला? चिटफंड आरोपींना तुम्ही कंपनीत संचालक केले?, असा आरोप भाग्यश्री आत्राम यांनी केला.

आता हे सरकार बदलू या..

मी प्रश्न विचारत राहणार? गैर आदिवासींना आदिवासी सेवक पुरस्कार दिला जात आहे. योग्य व्यक्तीला पुरस्कार दिला जात नाही. गैर आदिवासींना देखील अट शिथिल करून जमीन पट्टे दिले जात आहे. सुरजागड प्रकल्प उद्योगाने लक्षात घ्यावे, गाठ माझ्याशी आहे. शासनाकडून आदिवासी विकासाला निधी येतो. तो निधी पूर्ण खर्च होत नाही. आदिवासी प्रकल्पात गर्दी होत नाही. महायुती जाती जातीत तेढ निर्माण करत आहे, यामुळे आता हे सरकार बदलू या, असे भाग्यश्री आत्राम यांनी सांगितले.

अजितदादा चूक सुधारा…

मी घर फोडून जात नाही. धर्मरावबाबा नक्षल तावडीत होते. तेव्हा शरद पवार यांनी मध्यस्थी केली. मी त्यांच्या उपकाराची परतफेड केली. आता अजितदादा यांनी म्हटले, चूक झाली मग तुम्हीच चूक सुधारा, शरद पवार गटात या. 2019 ला बाबा भाजपच्या वाटेवर होते. त्यावेळी अजितदादा यांनीच मला बी फॉर्म दिला आणि घर फोडून उभे रहा, असे म्हटले याला जयंत पाटील साक्षीदार आहे. मी स्वतः भिंगरी सारखी फिरले आहे. मी आणि बाबा एकच नाही. माझा मार्ग वेगळा केला आहे. परंतु बाबा अजूनही राजाप्रमाणे थाटात आहेत. सुधारले नाही.

हात लावू नका, कापून टाकीन

आम्हाला कुणी हात धरून शिकविले नाही. आता मला संधी द्या, मी त्या संधीचे सोने करेन. माझ्यासोबत जनता आहे. परंतु आता माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या मिळत आहेत. परंतु ते शेर आहेत तर मी शेरनी आहे, माझ्या कार्यकर्त्याना हात लावू नका, कापून टाकीन, असे थेट आव्हान मुलीने बापाला दिले.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.