‘ओएसडींची जशी साफसफाई केली तशी साफसफाई…,’ काय म्हणाले आनंद परांजपे
शिवसेना ,भाजपानंतर राष्ट्रवादी देखील होणार आक्रमक झाली आहे. सीपी तलाव डम्पीग ग्राऊंड येथे लागलेल्या आगीमुळे गेल्या दोन दिवसापासून डंपिंग बंद झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून ठाणे शहरात ठिकठीकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्याच्या ढीगाऱ्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.

होळी आधीच ठाण्यात कचऱ्याच्या प्रश्नावरून शिमगा सुरू झाला आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने गेले काही दिवस घनकचरा उचलला जात नाहीए आणि कचरा उचलण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था देखील नाहीए… मागे युरोपवरून मशीन आणल्या आहेत. 1400 कोटी ठेका फडणवीस यांनी दिला होता. त्यानंतर त्याला पुन्हा तर ठेका देणार नाहीत ना असा माझा सवाल आहे. येत्या तीन दिवसात तोडगा निघाला नाही तर आम्ही पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकणार आहोत असा अल्टीमेटम राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना दिला आहे.
क्लीन ठाणे योजना राबवावी
मुंब्रा विभागात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून वसुली सुरू आहे.या मागे कोण याचा शोध पालिका आयुक्तांनी केबिनमधून बाहेर पडून केला पाहीजे, त्यांचे अधिकारीच वसुलीला लागले आहेत असा सनसनाटी आरोप आनंद परांजपे यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनात अधिकारी यांच्या नावाने पैसे वसूल करतो असे सांगितले आहे. मुंब्रा अनधिकृत बांधकाम आणि कचरा उचलणार कोण अशी स्पर्धा लागली आहे. ओएसडींची जशी साफसफाई केली तशी साफसफाई ठाणे महापालिकामध्ये करावी असा टोला आनंद परांजपे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता आनंद परांजपे यांनी लगावला आहे.
लाडकी बहीण योजना निकषात बदल नाहीच
लाडकी बहीण योजनेचे महायुती सरकारने कोणतेही निकष बदलले नाहीत. या योजनेविरोधात विरोधक कोर्टात गेले होते. ही योजना कशी बंद पडेल याचे देखील स्वप्न महाविकास आघाडीने बघितले होते. भरघोस अशी तरतूद मुख्यमंत्री लाडकी बहीण त्यासाठी जिथे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे असेही आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.एकनाथ शिंदे यांनी चालू केलेली कोणतीही योजना बंद झालेली नाही या सर्व योजना चालू राहतील असेही ते म्हणाले.




नितेश राणे यांनी जबाबदारीने बोलले पाहीजे
मंत्रीपदावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने भाष्य केले पाहीजे, कोणतेही वक्तव्य करताना भान ठेवला पाहिजे. आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे कुठल्याही धर्माचा आणि कुठल्याही जातीचा अपमान होता कामा नये. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव होणार नाही ही जाणीव मंत्रीपदावरती असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ठेवली पाहिजे आणि ज्या विषयावरती आपल्याला संपूर्ण माहिती नाही आपण इतिहासकार नाही अशा प्रकारची वक्तव्य करणे टाळली पाहिजे असा सल्ला आनंद परांजपे यांनी नितेश राणे यांना दिला आहे.