शरद पवार VS अजित पवार, शरद पवारांच्या भेटीला गेलेल्या आमदारावर मोठी कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आमदार सतीश चव्हाण यांना पक्षविरोधी भूमिका आणि शिस्तभंगाच्या आरोपाखाली सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. पक्षाने जारी केलेल्या पत्रात चव्हाण यांच्यावर १५ ऑक्टोबरला महायुती सरकारविरुद्ध प्रतिमा मलीन करण्याचा आरोप करण्यात आला आहे.

शरद पवार VS अजित पवार, शरद पवारांच्या भेटीला गेलेल्या आमदारावर मोठी कारवाई
शरद पवारांच्या भेटीला गेलेल्या आमदारावर मोठी कारवाई
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 6:12 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार सतीश चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सतीश चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. सतीश चव्हाण हे विधान परिषदेचे आमदार आहेत. ते आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे दाखल झाले होते. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. सतीश चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आता अजित पवार गटाकडून त्यांच्यावर सहा वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. “सतीश चव्हाण यांनी १५ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे. असे असताना आमदार सतीश चव्हाण यांनी जाणीवपूर्वक शिस्तभंग केली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे”, असं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

सतीश चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटलं आहे?

सतीश चव्हाण यांना पत्राद्वारे निलंबनाची माहिती देण्यात आली आहे. “आपण दिनांक १५/१०/२०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतलेली आहे. वास्तविकतः सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे. आपण वरील कृत्य जाणीवपूर्वक करून पक्ष शिस्तभंग केलेला असल्यामुळे आपणास सहा वर्षासाठी निलंबित करण्यात येत आहे”, असं संबंधित पत्रात म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'.
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?.
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'.
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास.
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल.
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?.
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.