लाडक्या बहिणींना घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करा, अजित पवार गटाचे उमेदवारांना आदेश

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पक्षाकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरायला जाताना कुटुंबातील व्यक्तींना घेऊन जाण्यापेक्षा लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना घेऊन जावे. यावेळी सदर महिलांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली असावी, असे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.

लाडक्या बहिणींना घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करा, अजित पवार गटाचे उमेदवारांना आदेश
अजित पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 8:11 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. राज्यभरात अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. विशेष म्हणजे राज्यभरातील जवळपास दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना गेल्या तीन महिन्यांमध्ये या योजनेचे पैसे मिळाले आहेत. या योजनेमुळे राज्यभरातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यातील जनतेने पुन्हा महायुतीच्या सरकारला निवडून दिलं तर महिलांसाठी सुरु झालेली ही लाडकी बहीण योजना नियमित सुरु राहील. तसेच या योजनेच्या रकमेत वाढ करण्यात येईल, असं सत्ताधारी नेत्यांकडून आश्वासन देण्यात येत आहे. राज्य सरकारला महिलांकडून या योजनेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यामुळे महायुतीमधील नेते देखील या योजनेचा निवडणुकीत पुरेपूर वापर करणार हे निश्चित आहे. याचबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पक्षाकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरायला जाताना कुटुंबातील व्यक्तींना घेऊन जाण्यापेक्षा लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना घेऊन जावे. यावेळी सदर महिलांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली असावी. लाडक्या बहीण योजनेचा महिलांना झालेला फायदा अधोरेखित करण्यासाठी पक्षाकडून पत्र काढून सूचना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. याचाच अर्थ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या हस्ते अजित पवार गटाचे उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही योजना निवडणुकीच्या रणधुमाळीतही चांगलीच गाजण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. तर काही छोट्या पक्षांनी एकत्रित येऊन तिसऱ्या आघाडीची स्थापना केली आहे. याशिवाय मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या वेळची निवडणूक फार वेगळी असणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे या दोन पक्षांचे चार पक्ष झाले आहेत. या निवडणुकीत कुणाला यश मिळत आणि कुणाचा पराभव होतो, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.