Ajit Pawar : दिशा सालियान प्रकरणावर प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले, की…
Ajit Pawar : आज शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार यांची भेट झाली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र आले. यावरुन उलट-सुलट राजकीय चर्चा सुरु झाल्या. या विषयासह औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा, दिशा सालियान प्रकरण यावर सुद्धा अजित पवार बोलले आहेत.

“वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्ताने जयंत पाटील यांची भेट झाली. 10 ला मीटिंग होती. मध्ये 10-15 मिनिटांचा मध्ये वेळ होता. उगाचाच वेगळ्या बातम्या पसरवल्या गेल्या. मला काही फोन आले. दादा अशा बातम्या येत आहेत. वीएसआयचा घटक असल्याने जनरल बॉडीच्या मीटिंगसाठी येत असतो. अधिवशेन असतं तर आज येऊ शकलो नसतो” असं अजित पवार जयंत पाटील यांच्या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी होतेय. त्यावर अजित पवारांना पत्रकारांनी विचारलं.
त्यावर अजित पवार म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या बारा बलुतेदारांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यात सर्व जाती, धर्म, पंथाचे लोक होते. मुस्लिम समाजातील लोक पण त्यात होते. दारुगोळा विभागाचा प्रमुख मुस्लिम समाजाचा होता. बरेच लोक होते” “छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरुषाच नाव घ्यायच. शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजमाता जिजाऊ या सगळ्या मान्यवरांनी नेहमीच सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सर्व समाजात जातीय सलोख ठेऊन पुढे नेण्याचा प्रयत्न केला” असं अजित पवार म्हणाले.
‘नको ते प्रश्न काढून तेढ निर्माण करु नका’
“आज आपल्यापुढे वेगळे प्रश्न आहेत. अशावेळी कोणी नको ते प्रश्न काढून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. कायदा-सुव्यवस्था संभाळण्याच काम सर्वांच आहे विशेषत: सरकारच जास्त आहे” असं अजित पवार म्हणाले.
दिशा सालियान प्रकरणात म्हणाले….
दिशा सालियान प्रकरणात प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले की, “त्या प्रकरणांमध्ये मी बातम्या वाचत आहे. एवढी मला माहिती नाही. कालपर्यंत मी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरात, पुरवणी मागण्यांमध्ये बिझी होतो. या ज्या गोष्टी चालल्यात माझं म्हणणं आहे की, बातम्या देताना वस्तुस्थितीला धरुन आम्ही बोललं पाहिजे. बातम्या देणाऱ्याने वस्तुस्थितीला धरुन बातमी दिली पाहिजे. हे प्रकरण न्यायालयात गेलय. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला वाटतं, त्याला न्याय मिळालेला नाही. त्यावेळी तो व्यक्ती संविधानानुसार न्यायालयात जाऊ शकतो”