‘अजित पवार मुख्यमंत्री होतील, कारण आमच्या 35 जागा निवडून येतील’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

"जर अजित पवार बारामती पडले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा-मुंब्रात काम करेन. पण जर निवडून आले तर जितेंद्र आव्हाड यांनी रोज सकाळी 8 वाजता वर्षा बंगल्यावर पाणी भरायला यायचं", असं चॅलेंज अमोल मिटकरी यांनी दिलं आहे.

'अजित पवार मुख्यमंत्री होतील, कारण आमच्या 35 जागा निवडून येतील', राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 3:31 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. यावेळी अमोल मिटकरी यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली. “जर अजित पवार बारामती पडले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा-मुंब्रात काम करेन. पण जर निवडून आले तर जितेंद्र आव्हाड यांनी रोज सकाळी 8 वाजता वर्षा बंगल्यावर पाणी भरायला यायचं. अजित पवार मुख्यमंत्री होतील कारण आमच्या 35 जागा निवडून येतील. स्ट्राईक रेटवर आम्ही मुख्यमंत्री पद घेऊ”, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. “जितेंद्र आव्हाड जर उद्या हरले आणि नजीब मुल्ला जिंकले तर मी कळवा-मुंब्रामध्ये जाऊन त्यांच्या घरासमोर झिंगाट डान्स करणार आहे”, असं मिश्किल वक्तव्य देखील अमोल मिटकरी यांनी केलं.

‘अजित पवार किंगमेकर ठरतील’

“शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांना जसं वाटतं की मुख्यमंत्री त्यांचा होईल तसंच आमचं देखील म्हणणं आहे की अजित पवार मुख्यमंत्री होतील. शेवटी अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे”, अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी मांडली. “अजित पवार किंगमेकर ठरतील. उद्या दुपारी १ पर्यंत सांगतो. आम्हाला आता देवगिरी बंगला सोडायचा आहे आणि वर्षा बंगला गाठायचा आहे”, असं देखील अमोल मिटकरी म्हणाले.

अमोल मिटकरी यांची नारायण राणेंवर प्रतिक्रिया

यावेळी अमोल मिटकरी यांना भाजप नेते नारायण राणे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “दोन्ही मोठे नेते आहेत. त्यांचा अंदाज दुर्लक्षित करून चालणार नाही. शेवटी २०१९ ला त्यांनी शिवसेना सोबत घेतली होती. त्यांचं वक्तव्य गांभीर्याने घ्यायला हवं”, असं अमोल मिटकरी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अमोल मिटकरी ‘वंचित’बद्दल काय म्हणाले?

अमोट मिटकरी यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमोल मिटकरी यांनी सूचक वक्तव्य केलं. “बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आमच्यासोबत असावेत ही आमची इच्छा आहे आणि ते सत्तेसोबत येणार म्हणजे महायुतीच्या सोबत येणार आहेत”, असं अमोल मिटकरी म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.