Chhagan Bhujbal | ‘यांना ब्राह्मण कोण म्हणणार?’, व्हॉट्स अपवर येणाऱ्या मेसेजवरुन छगन भुजबळ यांचा सवाल

Chhagan Bhujbal | सरस्वती पूजेबद्दलही भुजबळांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. जे घाणेरड्या शिव्या देतात त्यांना ब्राह्मण म्हणायच आम्ही. ज्यांनी मला शिव्या दिल्या, त्यांच्याबद्दल बोलतोय मी" असा छगन भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal | 'यांना ब्राह्मण कोण म्हणणार?', व्हॉट्स अपवर येणाऱ्या मेसेजवरुन छगन भुजबळ यांचा सवाल
chhagan bhujbalImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 10:54 AM

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी भिडे, ब्राह्मण समाज आणि सरस्वती पूजा या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. “संभाजी भिडे मनोहर कुलकर्णी आहेत खर आहे की नाही. ते सांगा. वाटेल ते बडबडतात. ते जर मनोहर कुलकर्णी असतील, तर संभाजी नाव घेऊन महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य का करतात? खास त्याच्यासाठी त्यांनी संभाजी नाव घेतलय का? त्यांचं खर नाव काय आहे? सहसा अशी नाव या समाजामध्ये नसतात. एवढच माझं म्हणण होतं?” असं छगन भुजबळ म्हणाले.

“सरस्वतीच्या बाबतीत मी म्हणालो होतो, आमचे हे देव आहेत. शाळेत, शिक्षणात यांचं कतृर्त्व आपण पुढे आणलं पाहिजे. घरात कोणाची पूजा करण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

‘धमक्यांना मी भीख घालत नाही’

“महात्मा फुले काम करत होते. त्यावेळी ब्राह्मण समाजातील समाजसुधारकांनी मदत केली होती. कर्मठ ब्राह्मण्यवाद परिस्थिती का होती? हे मी सांगत होतो. शाळा, कॉलेजच्या मुलांसमोर बोलणं स्वाभाविक आहे. त्यात कोणाला राग येण्याचा कारण नाही. बाकीच्या धमक्यांना मी भीख घालत नाही असं छगन भुजबळ म्हणाले. ‘जे घाणेरड्या शिव्या देतात त्यांना ब्राह्मण म्हणायच आम्ही’

व्हॉट्स अप मेसेज करुन धमक्या देण्यात येत आहेत, त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, “मी ब्राह्मण आहे म्हणतात आणि अतिशय घाणेरड्या भाषेत शिव्या देतात, यांना ब्राह्मण कोण म्हणणार? जे घाणेरड्या शिव्या देतात त्यांना ब्राह्मण म्हणायच आम्ही. ज्यांनी मला शिव्या दिल्या, त्यांच्याबद्दल बोलतोय मी” असा छगन भुजबळ म्हणाले. “मी चुकलो असेन, तर पोलिसांनी माझ्याविरुद्ध कारवाई करावी. कोणी चुकत असेल, कायदा हातात घेत असेल, तर त्याच्याविरुद्ध पोलीस कारवाई करतील” असं छगन भुजबळ म्हणाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.