निदर्शने सुरूच ठेवा… पुन्हा नवा एल्गार करावाच लागेल… छगन भुजबळ गरजले

आपली ओबीसींच्या मागण्यांवर राज्यभरात निदर्शने सुरू राहतील. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आपण निघणार आहोत.आता निखाऱ्यावर राख पसरली आहे. ते निखारे प्रज्वलित करण्यासाठी गेले पाहिजे. ते थांबणार नाही. संयमाने करायचं आहे. कुणाचाही अपमान करायचा नाही. मला आमंत्रण येणार तिथे मी जाणार असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

निदर्शने सुरूच ठेवा... पुन्हा नवा एल्गार करावाच लागेल... छगन भुजबळ गरजले
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 3:12 PM

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आता नाशिक येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपली पुढील रणनिती जाहीर केली आहे. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ओबीसींचा कैवार घेत राज्यात आंदोलन करीत फिरणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी समतेचे चक्र उलट दिशेने नेणाऱ्यांनाच आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी भाजपाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजितदादांचा उल्लेख देखील केला नाही. परंतू त्यांचा भाषणाचा सर्व रोख त्यांच्या विरोधात होता हे स्पष्ट झाले आहे. छगन भुजबळ पुढे म्हणाले की बावनकुळे भाजपचा अध्यक्ष तोही माझी बाजू घेतोय….

छगन भुजबळ यांनी यावेळी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात यल्गार करण्याचा फैसला घेतला आहे. भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं काय करायचे ते देखील माझी बाजू घेत आहेत. आता काय करायचं. ठिक आहे. प्रश्न माझ्या मंत्रिपदाचा नाही. प्रश्न जो आहे, समाजाचे जे प्रश्न उभे राहतील. त्यावेळी संरक्षणाची ढाल कोण उभी करणार आहे? मंत्रिपदं येतात जातात., किती वेळा आली गेली, विरोधी पक्षातही बसलो. विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलं ना. त्याचं काय एवढं दुखं घेऊन बसायचे असेही भुजबळ यावेळी म्हणाले.

अहवेलना करण्याचं शल्य मनात डाचतंय..

छगन भुजबळ पुढे म्हणाले की ओबीसींनी तुम्हाला एवढे दिल्यावर असं का? हा प्रश्न राज्य आणि देशातील जनतेला पडला आहे. कशासाठी. या मागचा हेतू काय आहे. काय बिघडलं असतं. ठिक आहे. मंत्रिपद नसेल तर रस्त्यावर मी आहे. सभागृहातही मी लढणार आहे आणि बोलणार आहे. पण अहवेलना करण्याचं शल्य मनात डाचतंय. असं का कुणासाठी असाही सवाल यावेळी छगन भुजबळ यांनी केला. यावेळी अनेकांनी सूचना केल्या. असं करा. तसं करा. मी सर्वांशी चर्चा करणार. मी उद्या परवा मुंबईत जाणार आहे. ओबीसीचे नेते, एल्गारचे नेते आहेत. देशातील आणि राज्यातील नेत्यांशी चर्चा करावी लागेल. त्यानंतर कदाचित पुढील पावले उचलावी लागेल. घाईत काही करायची गरज नाही. विचारपूर्वक पाऊल उचलणार आहे असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

मैं मौसम नही हूँ जो पल में बदल जाऊँ, मैं इस जमीन से दूर कहीं और ही निकल जाऊँ, मैं उस पुराने जमाने का सिक्का हूँ मुझे फेंक न देना, हो सकता है बुरे दिनों में मैं ही चल जाऊँ

भुजबळ यावेळी म्हणाले की मी मंत्रिपदावर नसलो तरी तुमच्यासोबत आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी लढणार आहे. तुमच्यासोबत लढता लढता शेवटचा श्वास घेणार आहे. यात मी कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. जिथे तुमचे प्रश्न आहेत. तिथे आपण एकजुटीने राहायचं आहे. मी तुमच्यासोबत राहणार. तुम्ही हिंमत ठेवा. वाट पाहा. तोपर्यंत आपलं काम सुरू ठेवा. पुढे कदाचित आणखी काही संकटं येण्याचं नाकारता येत नाही. तेव्हा पुन्हा ओबीसी एल्गार करावा लागणार आहे असेही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.