हसन मुश्रीफ यांच्याकडून ‘त्या’ जाहिरातीवर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त

महायुतीच्या जाहिरातीत छत्रपती शाहू महाराज यांचा फोटो न छापल्यामुळे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी याबाबत जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे.

हसन मुश्रीफ यांच्याकडून 'त्या' जाहिरातीवर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 9:51 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल? याबाबत उत्सुकता वाढली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल आणि कुणाला संधी मिळेल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “11 किंवा 12 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता आहे. माहितीचे तीन प्रमुख नेते बसून याबाबत निर्णय घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षाचा रोड मॅप जनतेसमोर ठेवला आहे. गतिमान सरकार पुढील पाच वर्षात आपल्याला पाहायला मिळेल. स्पष्ट बहुमत दिल्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागणार आहेत. मंत्रीपदावरून कोणत्याही पक्षाकडून रस्सीखेच किंवा मतभेद नाहीत. आमच्या पक्षाच्या वाटणीला जी मंत्रीपद येतील त्याचा सर्वस्वी निर्णय अजितदादा घेतील. त्यांच्या आदेशाचे पालन आम्ही सर्वजण करू”, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. “कोल्हापूर जिल्ह्यासाठी किती मंत्री पद मिळतील याची मला काही माहिती नाही. तीन प्रमुख नेते बसून याबाबत निर्णय घेतील”, अशी देखील प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली.

हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबतही प्रतिक्रिया दिली. “शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रद्द झाला आहे. काल मुख्यमंत्र्यांनी बोलताना देखील सांगितलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून… सांगलीपर्यंत शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्ग हवा असेल तर आपण नको कसं म्हणणार? कोल्हापूरच्या पुढे गोव्याला कसं जायचं हे सरकार ठरवेल. पण कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ हा रस्ता रद्द झालेला आहे”, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.

‘मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो’

“महायुतीच्या जाहिरातीमध्ये अनावधानाने राजर्षी शाहू महाराजांचा फोटो राहून गेला असेल. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण राजर्षी शाहू महाराजांना बाजूला करणे हे आमच्या मनात देखील नाही. संपूर्ण शासनाच्या वतीने मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘कोणत्याही लाडक्या बहिणीकडून वसुली करणार नाही’

“लाडक्या बहिणीची काळजी खासदार सुप्रिया सुळे यांनी करू नये. आम्ही 1500 रुपयांचे 2100 रुपये लवकरच करणार आहोत. नियमात असलेल्या सर्व लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळेल. पण टाटा, बिर्लाच्या मुलींना कसा याचा फायदा होईल? आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीकडून वसुली करणार नाही”, असं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.

“मुरगुडमध्ये विषबाधेमुळे दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संबंधित कुटुंबांना मदत करण्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार आहे. पण याबाबत फूड अँड ड्रग विभागाने चौकशी करावी”, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली. “शेतकऱ्यांना ऊसाची शेती आता परवडत नाही. शेतकऱ्यांची ही बाजू रास्त आहे. केंद्र सरकारने यामध्ये तत्काळ हस्तक्षेप करून चार हजार रुपये साखरेला हमीभाव द्यावा. अन्यथा साखर कारखानदारी अक्षरश: कोसळून पडेल”, असं मत हसन मुश्रीफ यांनी मांडलं.

“लोकसभेच्या वेळी ईव्हीएम चांगलं होतं. आता आमच्या जागा आल्या त्यावेळी ईव्हीएम बाद झालं का? अनेकवेळा निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने याबाबत खुलासा केला आहे. आतापर्यंत कोणीही सिद्ध केले नाही की, ईव्हीएम हॅक होतं. लाडकी बहीण, शेतकरी आणि महायुती सरकारने जे निर्णय घेतले होते त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये झाला”, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.