जयदत्त क्षीरसागर यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीड नगरपालिकेच्या विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी मोठी शक्ती पणाला लावून हा कार्यक्रम पार पाडला. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असताना त्यांनी लोकसभेच्या उंबरठ्यावर भाजपच्या सत्ताधारी नेत्यांना बोलावणं अनुकांना भुवया उंचवायला लावणारं होतं. संपूर्ण बीड शहर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे […]

जयदत्त क्षीरसागर यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीड नगरपालिकेच्या विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी मोठी शक्ती पणाला लावून हा कार्यक्रम पार पाडला. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असताना त्यांनी लोकसभेच्या उंबरठ्यावर भाजपच्या सत्ताधारी नेत्यांना बोलावणं अनुकांना भुवया उंचवायला लावणारं होतं. संपूर्ण बीड शहर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या फ्लेक्सने सजविण्यात आलं होतं.

राष्ट्रवादीत असतानाही जयदत्त अण्णांनी भव्य शामियाना लावून बुधवारी सत्ताधारी नेत्यांचे स्वागत केलं. भाजपचे आमदार सुरेश धस आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राजकीय भाष्य करताना राष्ट्रवादीचे आमंदार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर सरसंधान साधलं. यामुळे राष्ट्रवादीच्या आमदाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीला टीका ऐकण्याची वेळ आली आहे.

पुतणे संदीप क्षीरसागर यांना पक्ष फूस देत असल्याची खंत आणि सल घेऊन क्षीरसागर काहीतरी राजकीय भूमिका घेतात का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष होतं. मात्र विकासकामे आणि त्याचे आकडे मोजण्यापलीकडे जयदत्त क्षीरसागर काहीच बोलले नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या गतनिवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आणण्यात क्षीरसागर यांचा वाटा राहिलेला आहे. राष्ट्रवादीने क्षीरसागर यांना मोजणीतून वजा केल्याची आणि भाजपने क्षीरसागर यांना अर्थपूर्ण मदत केल्याने क्षीरसागर भाजपचे कुंकू लावतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र क्षीरसागर बंधूंनी एक शब्दही ढळू न देता अंदाज ताणण्यात यश मिळवले.  राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पवारांनी कौतुक करायचे आणि आज पवारांच्या पक्षाचे लक्तरे टांगायचे असे दुहेरी आणि द्विधा कर्म जयदत्त क्षीरसागर यांनी केलं. बीडमधील या कार्यक्रमात हजारो अण्णा समर्थकांना कुठलाही निर्वाणीचा संदेश दिला नसल्याने त्यांच्या मनात नेमके चालू तरी काय अशी चर्चा होत आहे.

जयदत्त क्षीरसागर हे माजी खासदार केशरकाकू यांचे पुत्र आणि त्यांचे राजकीय वारस आहेत. क्षीरसागर यांच्या राजकारणात धर्मनिरपेक्ष मतांचा निर्णायक वाटा राहिलेला आहे. भाजपकडे क्षीरसागरांचा कल हा त्यांच्या पारंपरिक मतदारांना न पटणारा आहे. आज गर्दी जमवण्यात क्षीरसागर यशस्वी झालेले असले तरी मुस्लीम मतदारांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू आणि नगर अध्यक्ष डॉ. भारतभूषण यांच्या राजकीय महत्त्वकांक्षा कार्यक्रमातून शब्दबद्ध झालेल्या आहेत. त्यास आमदार सुरेश धस आणि दस्तुर मुख्यमंत्र्यांनी अनुमोदन दिलं. यामुळे क्षीरसागर यांचा भाजपकडे असणारा झुकाव आणि त्यामुळे सेक्युलर वोट बँकेचा दुरावा हे परस्पर अवलंबून घटना ठरल्या तर वावगे नाही. जयदत्त क्षीरसागर यांच्या समोर असलेले पुतणे संदीप क्षीरसागर यांनी रात्रीतून मतांचा बुष्टर मिळेल आणि स्पर्धेत नसलेले संदीप थेट विजयाच्या समीकरणात येतील, असं मत बीडमधील राजकीय विश्लेषक आणि पत्रकार भागवत तावरे व्यक्त करतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.