व्हायरल व्हाट्सअ‍ॅप चॅट प्रकरणी पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

| Updated on: Dec 29, 2024 | 4:06 PM

बीड मोर्चानंतर व्हाट्सअ‍ॅप चॅट प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित व्हायरल चॅट आपले नसल्याचे स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

व्हायरल व्हाट्सअ‍ॅप चॅट प्रकरणी पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड
Follow us on

बीड मोर्चा संबंधित व्हायरल व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी संबंधित व्हायरल चॅट हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचा दावा केला होता. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या प्रकरणी आक्रमक झाले आहेत. संबंधित चॅट हा आव्हाडांचाच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांना बदनाम करण्यासाठीच काल बीडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी या चॅट प्रकरणार प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित चॅट आपले नसल्याचं आव्हाडांनी स्पष्ट केलं आहे.

“माझे काल भाषाण संपले. मी वापरत असलेला फोन आणि चॅर्टवरील सिग्नल वेगळे आहेत. माझा डीपी खरा नसून चुकीचा आहे. पोलीस तक्रार केली. माझ्या मोबाईलमध्ये मराठी टायपिंग हे माझा खाजगी माणूस करतो. मी कधीच टाईप करत नाही. या लोकांची घाणेरडी मानसिकता किती आहे. दलित, मुसलमान असा चॅर्टमध्ये उल्लेख आहे. हे दलित आणि मुस्लिम बाजारात विकत ठेवेल आहेत का? यांच्यात किती जाती, धर्म, द्वेष भरला आहे? वकिलांनी सांगावे कोणी चॅर्ट दिले आहेत. माझी एसपींना विनंती आहे, या प्रकरणात तपास करावे. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ असा मॅसेज तो मॅसेज मी शोधत आहे. नंबर देखील शोधत आहे”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

जितेंद्र आव्हाड काय-काय म्हणाले?

“आमदाराला धमकी देता. पण मी घाबरणार नाही. तुम्ही माणसे मारणार, मी त्याच जातीत आहे. मी त्या हमालच्या यादीत आहे. मी साहेबांच्या पक्षातील कार्यकर्ता आहे. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकेरी शब्दात बोलत नाही. मी सन्मानाने अजित पवार साहेब बोलतो”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला नाही. अजून दुःख वाटते. व्हॉटसअॅप चॅट प्रकरणावर कोणाला अटक करावी किंवा करु नये ते मला महिती नाही. पण प्रकरण समोर आले पाहिजे”, असं मत जितेंद्र आव्हाड यांनी मांडलं.

“अशा धमक्यांना मी घाबरत नाही असं मी फोनवरून शिव्या घालून सांगितलं आहे. मी त्याला फोनवरून शिव्या दिल्या आहेत. कारण त्याला असं वाटायला नको की तो खूप मोठा दाऊद इब्राहिम आहे. दहशतीचं वातावरण अनंतकाळ चालत नाही. ते कुठे तरी अंताला येतं. पोलिसांनी लक्ष द्यायला हवं की त्यांचा अजूनही माज उतरलेला नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.