NCP on Devendra Fadnavis: पवारसाहेबांनी दंगली रोखल्या असतील तर फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय?; राष्ट्रवादीचा सवाल

NCP on Devendra Fadnavis: पवारसाहेबांनी जर एखादं वाक्य बोलून शेकडो लोकांचे प्राण वाचवले असतील... दंगली रोखल्या असतील तर त्याच्यामध्ये फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय? 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का?

NCP on Devendra Fadnavis: पवारसाहेबांनी दंगली रोखल्या असतील तर फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय?; राष्ट्रवादीचा सवाल
पवारसाहेबांनी दंगली रोखल्या असतील तर फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय?; राष्ट्रवादीचा सवाल Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 7:54 PM

मुंबई: पवारसाहेबांनी जर एखादं वाक्य बोलून शेकडो लोकांचे प्राण वाचवले असतील… दंगली रोखल्या असतील तर त्याच्यामध्ये फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय? 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का? हे फडणवीस (devendra fadnavis) यांनी स्पष्ट करावे, असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (mahesh tapase) यांनी दिले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या संदर्भामध्ये काही ट्विट केले त्याला महेश तपासे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारसाहेब जातीवादी आहेत असा फडणवीस यांचा एकंदरीत सूर होता. मात्र महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ पाहता आता पक्षाला जातीवादी घोषित करणे एवढंच भाजपकडून बाकी होतं आणि त्याची सुरुवात भाजपचा नवीन फ्रंटमॅन राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये केली आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

गेल्या 50-55 वर्षात देशाचे नेते आदरणीय शरद पवारसाहेब यांनी समाजातल्या मागासलेल्या, अशिक्षित, दुर्बल अशा लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं सकारात्मक काम केलेले आहे. हे करत असताना जात आणि धर्म हे कधीच पाहिले नाही याची माहिती महेश तपासे यांनी दिली.

फडणवीसांचा विपर्यास

घटना समितीचे प्रमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील आरक्षणा संदर्भामध्ये समान संधी आणि मागासलेल्या समाजाच्या मागण्या या दोन गोष्टी सांगितल्या होत्या. कलम 370 रद्द केल्यानंतर त्यांच्या अवतीभवती एक राष्ट्रीय व्यापक पॉलिटिकल अजेंडा 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपकडून निर्माण करण्यात येत होता. महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या दरम्यान पवारसाहेबांनी 370 पेक्षा शेतकरी आत्महत्या आणि वाढती बेरोजगारी हे महाराष्ट्रासाठी अधिक महत्त्वाचे आहे असे विधान केले होते. त्या गोष्टीचा विपर्यास करून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी आपले ट्विट केले आहे.

ते देवेंद्र फडणवीस विसरले का?

जस्टीस राजेंद्र सच्चर यांच्या अध्यक्षतेत मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाकरीता एक उच्चस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आणि त्या समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा असे जर पवारसाहेबांनी म्हटले तर त्यात गैर काय? असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे. मंडल आयोगाची स्थापना जनता पार्टीचे तत्कालीन देशाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी केली होती हे देवेंद्र फडणवीस विसरले का? आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पवारसाहेबांनीच केली. त्यामुळे फडणवीस यांना मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात पण हरकत आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला आहे.

दोनच दिवसात दंगल थांबली

1993ला मुंबईमध्ये बारा साखळी बॉम्बस्फोट झाले होते. पवारसाहेबांनी तातडीने दूरदर्शनवरून मुंबईत तेरा स्फोट झाले असून तेरावा स्फोट हा मस्जिद बंदर या मुस्लिम बहुल वस्तीत झाला अशी घोषणा केली होती. पवारसाहेबांच्या या घोषणेमुळे मुंबईमध्ये धार्मिक हिंदू-मुस्लीम क्लेश टळला आणि शेकडो लोकांचे प्राण वाचले. श्रीकृष्ण आयोगानेदेखील पवारसाहेबांच्या या चतुराईचे समर्थन केलं आणि मुंबई दोनच दिवसांमध्ये पूर्व परिस्थितीप्रमाणे नॉर्मल झाली याची आठवणही त्यांनी करून दिली.

काश्मीर फाईल्समध्ये एकांगी चित्र रंगवले

काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया जोरात असताना काश्मिरी पंडितांच्यासोबत मुस्लिम, शीख, बौद्ध व इतर समाज यांच्यावरही फार मोठे अत्याचार झाले आणि त्यांनाही आपली घरे सोडावी लागली. परंतु काश्मीर फाईल हे फक्त काश्मीर पंडितांवरच हल्ला झाल्याचे एकतर्फी चित्र त्या चित्रपटाचे रंगवण्यात आले आहे. त्यामागे भाजपचा काय राजकीय हेतू आहे हे आता भारतातल्या सबंध जनतेला समजलेला आहे. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून काश्मिरी नागरिकांच्या पुनर्स्थापनेसाठी काश्मीर खोऱ्यामध्ये काय प्रयत्न केले हेही देवेंद्र फडणविसांनी आम्हाला सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली.

संबधित बातम्या:

Hanuman Chalisa Politics : तर मशिदीत हनुमान चालीसा लावून दाखवा, भाजपाचं शरद पवारांना आव्हान, मंदिरात इफ्तार पार्टीच्या आयोजनाचा वाद पेटला

Rohit Pawar : ‘राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपची, शॉल घेतली म्हणून कुणी बाळासाहेब होत नाही’, रोहित पवारांचा जोरदार टोला

Maharashtra News Live Update : ग्रामविकास खात्याने 8 हजार कोटी रुपये दिले नाही, त्यामुळे आमची थोडी कुचंबणा झाली आहे – नितीन राऊत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.