राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते मनोहर नाईकांच्या घरात उभी फूट, दोन्ही पुत्र विधानसभेत भिडणार आमने-सामने

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ययाती नाईक निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र आपल्यासाठी अनेक पर्याय आणि अनेक विधानसभामधून लढण्याचा मानस आपण उराशी बाळगलेला आहे, असे मत ययाती नाईक यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केलं.

राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते मनोहर नाईकांच्या घरात उभी फूट, दोन्ही पुत्र विधानसभेत भिडणार आमने-सामने
ययाती नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेतली
Follow us
| Updated on: Jun 09, 2024 | 6:00 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मनोहर नाईकांच्या घरात उभी फूट पाहायला मिळत आहे. नाईकांचे दोन्ही पुत्र येत्या विधानसभेत आमने-सामने भिडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. आपण आगामी विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे ययाती नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पुसद विधानसभेत दोन्ही नाईक पुत्र आमने-सामने भिडणार यात तीळमात्र शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ययाती नाईक निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र आपल्यासाठी अनेक पर्याय आणि अनेक विधानसभामधून लढण्याचा मानस आपण उराशी बाळगलेला आहे, असे मत ययाती नाईक यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केलं.

ययाती नाईक नेमकं काय म्हणाले?

“शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन होत असताना सुधाकरराव नाईक तिथे सोबत होते. त्याचबरोबर आमचा संपूर्ण परिवार शरदचंद्र पवार यांच्यासोबत होता. या परिसरात आपण बिघतलं, किंवा अजित पवार यांनी एक छोटा गट स्थापन करत भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यात इंद्रनिल त्यांच्यासोबत गेले. ते मला न विचारता गेले. मला खंत आहे की, त्यांनी दोन मिनिटं बोलून विचारलं असतं की, आपण काय निर्णय घ्यायचा, तर कदाचित हे चित्र दिसलं नसतं. याबाबतची नाराजी आहे”, अशी भूमिका ययाती नाईक यांनी मांडली.

“मी या ठिकाणी 20 वर्षांपासून काम करत आहे. या 20 वर्षांमध्ये माझ्यावर कुठली जबाबदारी दिली असती तर ती मी व्यवस्थित पार पाडली असती. दुसरा विषय लोकसभा निवडणुकीत मोहिनी नाईक यांचं नाव समोर आलं. त्यावेळेस सुद्धा मला विचारण्यात आलं नाही. कुणीतरी मला विचारलं असतं की, यांचं नाव आपण पुढे करायला पाहिजे का, तिकीट मागायला जायला पाहिजे का? तर मी सुद्धा त्यांना होकार दिला असता. त्यांच्या पाठिशी उभं राहिलो असतो. पण तिथेसुद्धा मला डावलण्याचं काम झालं”, अशी नाराजी ययाती नाईक यांनी मांडली.

“मागच्या विधानसभेच्या लीड आणि आधीच्या लीडमध्ये जास्त फरक नाही. यापुढे विधानसभेत लीड मिळवायचं असेल तर वेगळी रणनीती राखावी लागेल. यासाठी अभ्यास करत आहे. पुसदमध्ये आम्ही कुठेतरी मागे पडलो. त्यामुळे मी पुन्हा तालुक्यात फिरणार आहे. कुठे कमी पडलो यावर अभ्यास करेन”, असं ययाती नाईक म्हणाले.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.