‘पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणवीसांचा पोपट चिट्ठ्या काढतो’; मलिकांचा फडणवीसांवर पलटवार
चित्रपट जगातील 30 लोकांना बोलवण्यात आले, पण एकालाही अटक नाही. म्हणजे खंडणीसाठी त्याचा वापर होता याची चौकशी झाली पाहिजे. व्हिजिलन्स हेड ज्ञानेश्वर यांना लेखी पत्र देऊन समीर वानखेडे प्रकरणात चौकशी करण्यासाठी तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगतिले.
नागपूर : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सध्या ‘पोपट’ वॉर सुरु आहे. पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणविसांचा पोपट चिठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करत असतात, ज्यांचा धंदा आहे ते पोपट होऊ शकतात नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही. 100 पेक्षा जास्त लोकांना 26 खोट्या केसेसमध्ये अडकवले आहे, एनसीबीचे अधिकारी फर्जीवडा करून लोकांना अडकवत असेल, हजारो कोटींची खंडणी वसूल करत असेल, तर माझं काम आहे त्यांना अडवले पाहिजे, ते कर्तव्य म्हणून शेवटपर्यंत नेईल, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले. (Ncp leader Nawab Malik reaction on Devendra Fadanvis)
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत. भाजपचा जीव त्या पोपटात अडकला आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला होता. मलिक यांच्या या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रति टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना? असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला. याला आता नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
व्हिजिलन्स हेड ज्ञानेश्वर यांना लेखी तक्रार देणार
अनुराग कश्यप यांनी मला त्रास झाला असे सांगितले. जे अधिकारी लोकांना धमकी देत होते, ते आपल्याला अटक होईल म्हणून आज भीत आहेत. त्यांचासारखे शेकडो लोक आहेत. व्हिजिलन्स हेड ज्ञानेश्वर सिंग यांना विनंती आहे निःपक्षपणे कारवाई करावी. वानखेडे नामक अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाई दोन चार पाच ग्राम ड्रग जप्त केला आहे, एक वर्षापासून केस दाखल करून झाली पण त्यात कारवाई झाली नाही. चित्रपट जगातील 30 लोकांना बोलवण्यात आले, पण एकालाही अटक नाही. म्हणजे खंडणीसाठी त्याचा वापर होता याची चौकशी झाली पाहिजे. व्हिजिलन्स हेड ज्ञानेश्वर यांना लेखी पत्र देऊन समीर वानखेडे प्रकरणात चौकशी करण्यासाठी तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगतिले.
भाजपचे नेते समीर वानखेडेंना भेटतात
कुठले वैयक्तिक आरोप करण्यात आलेले नाही त्यांनी शेड्युल कास्ट दाखवून त्याचा फायदा घेतलेला आहे, त्यांच्या वडिलांनी धर्मांतर करून लग्न लावलेलं आहे. शिक्षण मुस्लिम म्हणून झालेलं आहे. लग्नाच्या दाखल्यात आणि जन्माचा दाखला यातही समीर दाऊद वानखेडे यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्याचे वडील मात्र आता शब्द पलटवत आहे, की मला त्या वेळेस गर्दीत माहित पडले नाही, त्यामुळे मी केलेले आरोप वैयक्तिक नाही हा शेड्युल कास्ट लोकांवर अन्याय आहे, त्यांचा दाखला बोगस असून त्याची चौकशी केली पाहिजे. महाराष्ट्र शासनाचा नियम आहे, ज्यात मुस्लिम व्यक्तीने धर्मांतर केले असेल तर त्याला शेड्युल कास्टचा लाभ घेता येत नाही. भाजपचे नेते समिर वानखडे यांना भेटत आहे. आज मी बोललो, विधीमंडळच्या अधिवेशत कोणत्या नेत्यांशी कोणते संबंध आहेत ते पटलावर ठेवणार, असे मलिक म्हणाले. (Ncp leader Nawab Malik reaction on Devendra Fadanvis)
इतर बातम्या