Rohit Patil | रोहित तू बिनधास्त जा, तू सांगितलेलं काम झालंच समज; नितीन गडकरींच्या भेटीचा किस्सा रोहितकडून शेअर

rohit patil: माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (R.R.Patil) यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगर पंचायतीची निवडणूक जिंकल्यानंतर ते अचानक प्रकाशझोतात आले आहेत. त्यांच्या या कामगिरीचं सत्ताधारी आणि विरोधकांनीही कौतुक केलं आहे.

Rohit Patil | रोहित तू बिनधास्त जा, तू सांगितलेलं काम झालंच समज; नितीन गडकरींच्या भेटीचा किस्सा रोहितकडून शेअर
नितीन गडकरींच्या भेटीचा किस्सा रोहितकडून शेअरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 10:32 AM

सांगली: माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (R.R.Patil) यांचे चिरंजीव रोहित पाटील (rohit patil) यांनी कवठेमहांकाळ नगर पंचायतीची निवडणूक जिंकल्यानंतर ते अचानक प्रकाशझोतात आले आहेत. त्यांच्या या कामगिरीचं सत्ताधारी आणि विरोधकांनीही कौतुक केलं आहे. या यशानंतर नगरपंचायतीच्या क्षेत्रातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी रोहित पाटील यांनी काही नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू केल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांची रोहित पाटील यांनी दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतरचा अनुभव रोहित पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. “दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणं गरजेचं आहे” या वाक्याची प्रचिती आली आणि रोहित तू बिनधास्त जा. तू सांगितलेलं काम झालंच असं समज” हे वाक्य धीराचे होते, असे रोहित पाटील यांनी गडकरींच्या भेटीनंतर म्हटले आहे. रोहित यांनी या भेटीचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.त्याचबरोबर कवठेमहांकाळ नगरपंचायती बाबत माहिती घेऊन तिथे मिळालेल्या यशाबद्दल गडकरींनी आपले अभिनंदन केल्याचेही रोहित पाटील यांनी म्हटले आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी (नागज- सांगोला महामार्ग) येथे ब्रीज अंडरपास उपलब्ध करून दिला जावा आणि सदरचा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ग्राह्य धरला जावा, अशी विनंती रोहित पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिल्लीत भेट घेऊन केली. यावेळी गडकरी यांनी या कामांसाठी त्यांनी सकारात्मक दृष्टीने निर्देश देत लवकरच हे दोन्ही कामे होतील अशी हमी दिली असल्याचं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.

गडकरींकडून अभिनंदन

आज दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांबाबत चर्चा केली. त्याचबरोबर गडकरींनी कवठेमहांकाळ नगरपंचायती बाबत माहिती घेऊन अभिनंदन केले, असंही रोहित यांनी म्हटलं आहे.

रोहित पाटलांची जादू

23 वर्षीय रोहित पाटील यांनी विरोधकांना धूळ चारत कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे रोहित यांच्या या विजयाचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. रोहित पाटील यांची कारकिर्द खऱ्या अर्थाने विजयापासून सुरू झाली. त्यांच्या या कामगिरीची राष्ट्रवादीने दखल घेऊन त्यांच्यावर दुसरीकडे रोहितवर राष्ट्रवादीची ताकद उभी करण्यासाठीच युवक अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे रोहित पाटील यांचं राष्ट्रवादीतील आणि जिल्ह्यातील वजनही वाढलं आहे.

संबंधित बातम्या:

Rohit Patil | रोहित पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद मिळणार? ; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने दिले संकेत

Sanjay Raut : मुंबईकरांच्या भावनांशी खेळ, INS विक्रांतच्या नावाखाली 57 कोटी रुपये घशात घातले, राऊतांचा सोमय्यांवर आरोप

हुंड्याचे फायदे काय? नर्सिंग विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात पुस्तक, राष्ट्रीय महिला आयोगाचे शिक्षण मंत्र्यांना कारवाईचे आदेश

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.