बहिणींना 1500 रुपये देतात, पण…शरद पवार यांचा महायुती सरकारवर हल्ला

Sharad Pawar: सत्तेचा माज या लोकांच्या डोक्यात शिरला आहे. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार आपणास दिला आहे. परंतु या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे. त्यांना आता खड्ड्यासारखे बाजूला काढा. या निवडणुकीत ती संधी तुम्हाला आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

बहिणींना 1500 रुपये देतात, पण...शरद पवार यांचा महायुती सरकारवर हल्ला
शरद पवार
Follow us
| Updated on: Sep 15, 2024 | 12:08 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी शिंदखेड्यात शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या शेती धोरणावर जोरदार हल्ला केला. आपण दहा वर्ष कृषी विभागाचे काम करत होतो, तेव्हा देश अन्नधान्यसंदर्भात स्वयंपूर्ण झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार म्हणाले की, आजच्या राज्यकर्त्यांना शेतीची आस्था नाही. त्यांच्याकडून शेतीसंदर्भात धोरणे राबवले जात नाही. कांद्यासंदर्भातील उदाहरण समोर आहे. मोदी सरकारने त्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. कांद्याला भाव मिळाला नव्हता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कष्टाने कांद्याचे पीक घेतले. त्यानंतर निर्यात बंदी करण्यात आली. गहू, तांदुळावर बंदी घातली. जे, जे तुम्ही पिकवता त्यावर निर्यात बंदी केली. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. दहा वर्ष म्हणून मी शेतीचे जे काम केले त्यामुळे जगात सर्वाधिक तांदूळ पिकवणारा देशात भारत पहिल्या क्रमांकावर पोहचला.

बहिणींचा सन्मान राखला जावा, पण…

धुळ्यातील शिंदखेडा येथील शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते. जेसीबीवरून शरद पवारांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शरद पवार म्हणाले, आता गुंडगिरीचे राज्य सुरु झाले आहे. सत्तेचा गैरवापर सुरु झाला आहे. ना कारखाने, ना सहकार चळवळीसाठी या सरकारने काम केले. रोजगार दिला नाही. गेल्या २० वर्षांत काहीच विकास झाला नाही. हे सरकार बहिणींना 1500 हजार रुपये देणार आहे. पण बहिणींची अब्रू वाचविण्याची गरज आहे. बहिणींचा सन्मान राखला जावा, त्याकडे सरकारचे लक्ष नाही, असा जोरदार टोला लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर शरद पवार यांनी केला.

आता या सरकारला खड्यासारखे बाजूला काढा

सत्तेचा माज या लोकांच्या डोक्यात शिरला आहे. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार आपणास दिला आहे. परंतु या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे. त्यांना आता खड्ड्यासारखे बाजूला काढा. या निवडणुकीत ती संधी तुम्हाला आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

तुम्ही हे राज्य महाविकास आघाडीच्या हातात द्या, महाराष्ट्राचा चेहरा तुम्हाला बदललेला दिसणार, अशी ग्वाही मी देतो, असे शरद पवार यांनी या मेळाव्यात सांगितले.

‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली.
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च.
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?.
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा.
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन.