‘देवेंद्र फडणवीस यांना माझं स्थान कळलंच असेल’; राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांचा टोला

"शरद पवार यांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती", असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यांच्या या आरोपाला आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "आपल्या पत्रामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागते. त्यामुळे फडणवीसांनी माझं स्थान ओळखावं", असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.

'देवेंद्र फडणवीस यांना माझं स्थान कळलंच असेल'; राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांचा टोला
राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांचा टोला
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 6:22 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. प्रत्येक पक्षाचे मोठमोठे नेते राज्यभरात फिरत आहेत. प्रत्येक पक्षाचे उमेदवार सर्वसामान्य नागरिकांच्या घरोघरी जात मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. पुढच्या दोन दिवसात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पण त्याआधी आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर लागलेल्या राष्ट्रपती राजवटीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली होती, असा आरोप केलाय. त्यांच्या आरोपांवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीसांनी माझं स्थान ओळखावं, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे आरोप काय?

“2019 च्या निवडणुकीनंतर सरकार स्थापनेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी, मग सरकार स्थापन करु, असं बैठकीत ठरलं होतं. शरद पवार राज्याचा दौरा करणार, मग भाजप-राष्ट्रवादीचं स्थिर सरकार स्थापनेची घोषणा करणार होते”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“सरकार स्थापनेसाठी बैठकीत सर्व शरद पवार यांच्याच सूचनेनुसार ठरलं. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी परावांनी पत्र दिलेलं. ते पत्र माझ्या कार्यालयात टाईप झालं. पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी शरद पवारांनी त्यात काही बदल सुचवले. प्रत्यक्षात शरद पवारांच्या पत्रामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली”, असं देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांची प्रतिक्रिया काय?

शरद पवारांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी शरद पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रपती राजवटबाबतच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. “मी फडणवीस यांचा आभारी आहे. मी सत्तेत नव्हतो. माझ्याकडे काही संस्थेचं सदस्यत्व नाही की, मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागते. तरी मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागते. याचा अर्थ त्यांनी ओळखलं पाहिजे की, राजकारणात माझं स्थान काय आहे”, असा टोला शरद पवारांनी लगावला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.