जेव्हा राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षा पोलीस ठाण्यात ढसाढसा रडतात

विनया तब्बल दोन तास पोलीस ठाण्यात न्यायासाठी रडत होत्या (NCP leader Vinaya Patil wept in Police station for justice).

जेव्हा राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षा पोलीस ठाण्यात ढसाढसा रडतात
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 4:46 PM

ठाणे : मुलाला बेदम मारहाण झाली. तीन दिवस उलटून गेले तरी ठोस कारवाई होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षांना पोलिस ठाण्यात दोन तास रडत बसावे लागले. अखेर पोलिसांनी आरोपीना अटक केली. सत्ताधारी पक्षातील महिला  पदाधिकाऱ्यासोबत असा प्रकार होत असेल तर सर्व सामान्यांचे काय? असा प्रश्न आत्ता उपस्थित होत आहे (NCP leader Vinaya Patil wept in Police station for justice).

डोंबिवली पूर्वेतील आजदेगाव परिसरात राहणारे विश्वनाथ पाटील यांचा या परिसरात राहणारे बबन पडवळ यांच्याशी काही वाद झाला. या वादानंतर बबन पडवळ आणि त्यांचा मुलगा शुभम पडवळ यांनी विश्वनाथ पाटील यांचा मुलगा प्रथम पाटील याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रथम पाटील गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवस उलटून गेले तरी ठोस कारवाई झाली नाही. विश्वनाथ पाटील यांची पत्नी विनया पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डोंबिवली महिला जिल्हा कार्याध्यक्ष पदावर आहेत. ठोस कारवाई होत नसल्याने विनया या मानपाडा पोलीस ठाण्यात पोहोचल्या.

विनया यांचा आरोप आहे की, दारुच्या नशेत आरोपींनी मारहाण केली. पोलिसांनी त्यांची साधी वैद्यकीय चाचणी केली नाही. किरकोळ कलमे लावून त्यांना सोडण्यात आले, असा त्यांचा दावा आहे. विशेष म्हणजे विनया तब्बल दोन तास पोलीस ठाण्यात न्यायासाठी रडत होत्या (NCP leader Vinaya Patil wept in Police station for justice).

या घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष वंडार पाटील त्याठिकाणी पोहचले. अखेर मानपाडा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. तब्बल दोन तास सत्ताधारी पक्षाच्या महिला पदाधिकारी विनया पाटील यांना ठोस कारवाईसाठी मानपाडा पोलिस ठाण्यात गयावया करावी लागली. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांसोबत पोलिसांची काय वागणूक असेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी काही  बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा : मध्यप्रदेशात काँग्रेसमध्ये आलबेल नाही, कमलनाथ यांचे राजकीय संन्यास घेण्याचे संकेत?

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.