Anil Patil | ‘कोर्टाने जे म्हटलं ते मला उचित वाटत नाही’, मंत्री अनिल पाटील यांचं मोठं वक्तव्य

सुप्रीम कोर्टाने आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजांवर नाराजी व्यक्त केली. तसेच आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी एका आठवड्यात सुनावणी घ्या, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशावर मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

Anil Patil | 'कोर्टाने जे म्हटलं ते मला उचित वाटत नाही', मंत्री अनिल पाटील यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 8:47 PM

जळगाव | 18 सप्टेंबर 2023 : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टाने 11 मे ला दिलेल्या आदेशाचं पालन झालं नाही. विधानसभा अध्यक्षांनी ठराविक वेळेत अपात्रतेप्रकरणी निर्णय घ्यावा, असा आदेश देण्यात आला होता. पण कोर्टाच्या आदेशाचा आदर केला गेला नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना या प्रकरणी एक आठवड्यात सुनावणी घेण्याचा आदेश दिलाय. कोर्टाच्या या आदेशावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.

कोर्टाने दिलेल्या आदेशाचा आश्चर्याचा धक्का बसला, अशी प्रतिक्रिया मंत्री अनिल पाटील यांनी दिली. “कोर्टाला निर्णय घ्यायला 9 ते 10 महिने लागत असतील तर अध्यक्षांना देखील वेळ मिळायला हवा”, असं अनिल पाटील म्हणाले आहेत. “कोर्टाने जे काही म्हटलंय ते मला उचित वाटत नाही”, असंही अनिल पाटील म्हणाले.

अनिल पाटील नेमकं काय म्हणाले?

“सत्तासंघर्षामध्ये मलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. न्यायाधीशांनी एक आठवड्यात सुनावणी घ्या असा आदेश दिला असेल तर निर्णय कधी घ्यायचा, किती तपासावं, न्यायालयात नऊ-दहा महिने लागत असतील तर अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी किती कालावधी असला पाहिजे? ही प्रकिया आहे. त्यामुळे एवढ्या दिवसात निर्णय घ्या, असं म्हणणं मला उचित वाटत नाही”, असं अनिल पाटील म्हणाले.

“मला आत्मविश्वास आहे, न्यायालयील प्रक्रियेची अभ्यास केल्यानंतर आतापर्यंत शेड्यूल 10 मध्ये जे म्हटलं असेल त्या दहाव्या शेड्यूलमध्ये ज्याची तरतूद केलीय, पक्ष कुणाकडे असला पाहीजे, पक्ष असण्यासाठी जे निकष असतील त्यामध्ये मला आत्मविश्वास आहे, ज्यांनी ज्यांनी निर्णय घेतला असेल, मग तो राष्ट्रवादी किंवा शिवसेनेने घेतला असेल तो योग्य असेल”, अशी भूमिका अनिल पाटील यांनी मांडली.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्वत: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आपल्याकडे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची कोणतीही प्रत आलेली नाही. आपल्याकडे प्रत आल्यानंतर आपण वाचून, अभ्यास करुन सविस्तर भूमिका मांडू, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.