राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात काय घडतंय? चक्क दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला

सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असताना मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील हे आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ते शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात काय घडतंय? चक्क दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला
दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 4:08 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रचंड घडामोडी घडत आहेत. राज्यात निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता महायुतीचं सरकार राज्यात स्थापन होणार आहे. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी उद्या रात्री 12 वाजेपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे कदाचित उद्या नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे. पण तरीही राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचा सस्पेन्स आहे. राज्यात भाजपला सर्वाधिक 132 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे भाजप मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार आहे. पण भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत धक्कातंत्राचा अवलंब करुन नव्या चेहऱ्याचं नाव समोर केलं किंवा एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी दिली तर नवा इतिहास रचला जाणार आहे. सर्वाधिक जागांवर यश मिळवल्याने याबाबतचा निर्णय घेण्याचा सर्वाधिक अधिकार भाजपला आहेत. महायुतीच्या दिग्गजांची आज दिल्लीत भाजपच्या हायकमांडशी चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरणार असल्याची चर्चा आहे.

एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील हे आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. याबाबत त्यांनी स्वत: तशी माहिती दिली. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्या मनात नेमकं काय आहे? किंवा दोन्ही राष्ट्रवादींमध्ये काही वेगळं घडतंय का? असाही प्रश्न उपस्थित होतोय. अर्थात याबाबतच्या काही घडामोडी आगामी काळात घडतील तर ते स्पष्ट होईलच. दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

दिलीप वळसे पाटील काय म्हणाले?

दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगावात निवडणूक लढवली. शरद पवार गटाचे देवदत्त निकम विरुद्ध वळसे पाटील यांच्यात लढत झाली. वळसे पाटील यांचा प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव आहे. पण तरीही देवदत्त निकम यांनी त्यांना टफ फाईट दिली. कारण त्यांच्यामागे शरद पवार यांचं पाठबळ होतं. शरद पवारांनी आंबेगावात सभादेखील घेतली होती. यामुळे मतमोजणीच्या शेवटच्या घटकेपर्यंत सस्पेन्स राहीला. अखेर अटीतटीच्या या लढतीत दिलीप वळसे पटील यांचा निसटता विजय झाला. ते अवघ्या हजार मतांनी विजयी झाले.

हे सुद्धा वाचा

या विजयानंतर दिलीप वळसे पाटील आज शरद पवारांच्या भेटीला आले. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी फार बोलणं टाळलं. पण त्यांनी चार वाक्यात प्रतिक्रिया नक्की दिली. “इथे मी पवार साहेबांची (शरद पवार यांची) भेट घेणार आहे. काही नाही, फक्त नमस्कार करणार. राजकीय चर्चा नाही. फक्त प्रतिष्ठानची बैठक आहे. त्या बैठकीसाठी मी आलो आहे”, असं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...