‘राष्ट्रपती राजवट लागू होणार’ ; ‘या’ वक्तव्यावर राष्ट्रवादीचा नेता ठाम कारण…

बंडखोर आमदारांविषयी सांगताना त्यांनी कर्नाटक निवडणुकीविषयीही बोलताना त्यांनी सांगितले की, कर्नाटक राज्याच्या निवडणूक लढण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेते घेणार आहेत.

'राष्ट्रपती राजवट लागू होणार' ; 'या' वक्तव्यावर राष्ट्रवादीचा नेता ठाम कारण...
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 9:59 PM

सांगली : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारविषयी विरोधकांकडून सातत्याने सरकार कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने त्याविषयावरूनही जोरदार राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी हे सरकार येत्या काही दिवसात कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली होती. शिंदे-फडणवीस सरकार कोसळल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांच्यावर सत्ताधारी गटाकडून जोरदार टीका केली जात आहे.

आमदार जयंत पाटील यांनी हे शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार अशीही त्यांनी शक्यता वर्तवली होती.

त्यामुळे सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार एक महिन्यात कोसळणार, दोन महिन्यात कोसळणार अशा फक्त वल्गना केल्या जात आहे.

मात्र हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा विश्वास सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे. तरीही जयंत पाटील यांनी हे सरकार कोसळणार आणि राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याच्या आपल्या मतावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार जयंत पाटील यांनी सांगितले की, आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आपात्रता झाली तर बंडखोर आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडेच परततील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या केलेल्या वक्तव्यावर माजी मंत्री जयंत पाटील ठाम आहेत. कारण त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल लागल्यावर आपात्रता होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेचे आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार आहे. त्यामुळे त्यानंतर भाजपा नेतृत्वाला दुसरा पर्यायच उरणार नसल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

बंडखोर आमदारांविषयी सांगताना त्यांनी कर्नाटक निवडणुकीविषयीही बोलताना त्यांनी सांगितले की, कर्नाटक राज्याच्या निवडणूक लढण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेते घेणार आहेत.

निर्णय घेण्याचा आपल्याला काय अधिकार नाही आपण एक छोटा कार्यकर्ता असल्याची प्रतिक्रियाही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.