AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवार कोरोना रुग्णांच्या मदतीला सरसावले, मतदारसंघात 300 रेमडिसीविर, 10,000 एन-95 मास्क, 650 बेडची व्यवस्था

कोरोनाचं संकट आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा सरसावले आहेत.

रोहित पवार कोरोना रुग्णांच्या मदतीला सरसावले, मतदारसंघात 300 रेमडिसीविर, 10,000 एन-95 मास्क, 650 बेडची व्यवस्था
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 7:30 PM

अहमदनगर : राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यशासन चिंतेत आहे. अहमदनगर जिल्ह्यात आणि तालुक्यातही रुग्णांची वाढती संख्या विचार करायला लावणारी आहे. ही कोरोनाचं संकट आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा सरसावले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून पुणे, नगर, बीड, सोलापूर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तुटवडा असलेल्या 300 रेमडिसीविर इंजेक्शनची (remdesivir injection) उपलब्धता करून दिलीय (NCP MLA Rohit Pawar avail 300 remdesivir injection oxygen and n 95 mask in Ahmednagar).

अमहदनगर येथील कोरोनाचा वाढता आकडा पाहता रोहित पवार यांनी तेथील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या जिल्हा रुग्णालयाला सुरक्षिततेसाठी 5000 एन-95 मास्कचा पुरवठा केलाय. याशिवाय कर्जत-जामखेडसाठीही त्यांनी 5000 एन-95 मास्क पाठवले आहेत. त्यांनी कोरोना रुग्णांसाठी आवश्यक 25 ऑक्सिजन सिलेंडर कर्जतसाठी आणि 25 सिलेंडर जामखेडसाठी उपलब्ध करुन दिले आहे.

कर्जत तालुक्यातील रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी रोहित पवारांच्या माध्यमातून पुणे मुंबई शहरांच्या धरतीवर रुग्णांसाठी कर्जत जवळील गायकरवाडी येथे 350 अद्ययावत बेडची व्यवस्था करण्यात आली. जामखेड येथेही 300 बेडचे कोरोना सेंटर व्यक्तिगत स्वरूपातून उभा करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

स्वतः रक्तदान करत तरुणांना रक्तदानाचे आवाहन!

राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताअभावी कुणालाही आपला जीव गमावू लागू नये म्हणून रोहित पवार यांनी राज्यातील युवांना रक्तदानाचं आवाहन केलंय. इतकंच नाही तर त्यांनी स्वतः रक्तदान करत तरुणांना कृतीतून संदेश दिलाय. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून रक्तदान करा असं आवाहन रोहित पवारांनी सोशल मिडियावर केले आहे.

हेही वाचा :

‘जेवढे प्रयत्न सरकार पाडण्यासाठी करताय तेवढे राज्याच्या हितासाठी करा’, रोहित पवारांचा फडणवीसांवर पलटवार

कोरोना लसीचा तुटवडा संपवण्यासाठी रोहित पवारांचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सल्ला, म्हणाले…

MPSC परीक्षार्थींसाठी रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची मागणी, वाहतुकीसह वयोमर्यादेचा मुद्दा उपस्थित

व्हिडीओ पाहा :

NCP MLA Rohit Pawar avail 300 remdesivir injection oxygen and n 95 mask in Ahmednagar

मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर.
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.