आघाडीची सत्ता पुन्हा येणार नाही, जनतेसाठी भाजपात जातोय : वैभव पिचड

या मेळाव्याला मधुकर पिचड (Madhukar Pichad), वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. पिचड यांच्या निर्णयासोबत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. शिवाय मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीकडे राजीनामे सुपूर्द केले.

आघाडीची सत्ता पुन्हा येणार नाही, जनतेसाठी भाजपात जातोय : वैभव पिचड
Follow us
| Updated on: Jul 27, 2019 | 5:10 PM

शिर्डी : राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरुच आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचडही (MLA Vaibhav Pichad) 30 जुलैला भाजपात प्रवेश करणार आहेत. नगर जिल्ह्यातील अकोले येथे पिचड समर्थकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मधुकर पिचड (Madhukar Pichad), वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. पिचड यांच्या निर्णयासोबत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. शिवाय मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीकडे राजीनामे सुपूर्द केले.

“पवारांचे उपकार कधीही फेडू शकणार नाही”

शरद पवार यांचे उपकार कधीही विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया वैभव पिचड यांनी दिली. आयुष्यात कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. कटू निर्णय असला तरी तो घ्यायची वेळ आली आहे. शरद पवारांच्या माध्यमातून मतदारसंघाचा मोठा विकास झाला. खांद्याला खांदा लावून काम केलं. लोकसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराला 32 हजाराचं मताधिक्य दिलं. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करताना विकासकामाला खिळ बसली. मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेत. आपण सत्ताधारी पक्षात जावं ही जनतेची मागणी आहे. पवारांचे उपकार मी कधीही फेडू शकत नाही, असं वैभव पिचड म्हणाले.

पुन्हा आघाडीची सत्ता येणार नाही अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सत्तेत असणं गरजेचं आहे. हा निर्णय घेणं खुप अवघड होतं. पण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निर्णय घेतला. मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलंय. त्यामुळे भाजपात प्रवेश करत असल्याची घोषणा वैभव पिचड यांनी केली.

मधुकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मधुकर पिचड पवारांसोबत राहिले. 35 वर्ष त्यांनी अकोले मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांना सतत मंत्रिपद मिळालं.

विरोधी पक्षनेते म्हणूनही मधुकर पिचड यांनी काम पाहिलं. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुत्र वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. सध्या ते विद्यमान आमदार आहेत. अकोले तालुक्यावर पिचड यांची मजबूत पकड आहे. पिचड पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. येत्या 30 जुलै रोजी पिचड यांचा भाजप प्रवेश होणार यावर शिक्कामोर्तब झालंय. वडील मधुकर पिचड हे देखील माझ्या निर्णयासोबत असल्याची स्पष्टोक्ती आमदार वैभव पिचड यांनी दिली.

भाजप खासदार डॉ. सुजय विखे आणि त्यांचे वडील गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आता नगर जिल्ह्यातील अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. पिचड यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीला नगर जिल्ह्यात मोठं भगदाड पडलंय.

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर पिचडांशी मैत्रीपूर्ण संबध असताना ते पिचडांना रोखू शकले नाहीत. जिल्हा बँक, जिल्हा परिषद तसेच अकोले मतदारसंघात पिचड यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादी खिळखिळी झाली असून नगर जिल्ह्यातून आता कोणकोणते बडे नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला रामराम ठोकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुढील पिढीच्या भविष्याचा विचार

शरद पवारांची साथ सोडताना मोठं दुःख होत असल्याची प्रतिक्रिया मधुकर पिचड यांनी दिली. सत्ता नसल्यास आदिवासींचे प्रश्न कोण सोडणार असा प्रश्न आहे. लोकांच्या विकासासाठी भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतलाय. माझ्या वैयक्तिक निर्णयापेक्षा जनतेच्या निर्णयामुळे भाजपात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.