प्रफुल पटेल साहब आपसे तो ये उम्मीद न थी… कोणी केली बोचरी टीका

आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे पुणे प्रकरण असो की वसई प्रकरण असो... की आताचे नागपूर अपघात प्रकरण नेत्यांच्या मुलांनी एखादी घटना केली. तर त्या प्रकरणावर पडदा टाकण्यात येतो अशी टीका या नेत्याने भाजपावर केली आहे.

प्रफुल पटेल साहब आपसे तो ये उम्मीद न थी... कोणी केली बोचरी टीका
praful patel
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 5:29 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या शिव स्वराज्य यात्रेने आज गोंदिया जिल्ह्यात प्रवेश केला आहे. गोंदिया जिल्हा हा प्रफुल पटेल यांचा बाले किल्ला म्हटला जातो. शिव स्वराज्य यात्रेच्या प्रवेशानंतर पत्रकारांनी प्रफुल पटेल यांच्या बद्दल अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारले, त्यावर ते म्हणाले की शिवस्वराज यात्रा ही स्वाभिमानासाठी काढलेली यात्रा आहे आणि मी प्रफुल पटेल यांच्यावर बोलावे एवढा मोठा नेता मी नाही ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत असे ते स्वत: म्हणतात असे म्हणत अमोल कोल्हे यांनी प्रफुल पटेल साहब आपसे तो ये उम्मीद न थी असा शालजोडा कोल्हे यांनी लगावला आहे.

बिहार पॅटर्न राबवून मला मुख्यमंत्री करा..

अजित पवार यांनी अमित शाह यांच्याकडे बिहार पॅटर्न राबवून मला मुख्यमंत्री करा अशी मागणी केल्याचे वृत्त ‘द हिंदू’ या वृत्तपत्राने दिले आहे. यावर बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की मुळातच हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अजितदादांची परिस्थिती आज… येऊ नको की तर कुणाच्या गाडीत बसू अशी झाली आहे. महायुतीच्या सर्व्हेमध्ये त्यांचे केवळ 12 आमदार जिंकून येण्याची शक्यता आहे, मग 28 आमदारांचे काय ? असा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर असेल. या आमदारांना आता आमचे काय होणार ? हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे, त्यामुळे दादांनी काय मागणी केली हे मला माहीत नाही असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

पक्षात कोणाला घ्यायचं की नाही हे …

महायुतीच्या सर्वे मध्ये अजित पवार गटाला 7 ते 12 जागा दाखविल्या आहेत, त्यामुळे इतर आमदार आपल्या संपर्कात आहेत का ?असा प्रश्न केला असता अमोल कोल्हे म्हणाले की शरद पवारांसोबत काही जण ठामपणे उभे राहिले आहेत, परंतु जे आता वारा बघून उड्या मारतात त्याबाबत त्या ठिकाणचे कार्यकर्ते ठरवतील असं कोल्हे यांनी म्हटले आहे.

तर हे सरकार सर्वसामान्यांचे नाही…

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला आहे. मात्र या प्रकरणात सत्ताधारी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. यावर बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की हे पुण्याच्या पोर्शे प्रकरणाप्रमाणे  या प्रकरणावर सुद्धा अशाच प्रकारे महायुती सरकार पडदा टाकत असेल.. तर हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचे नाही. असा लोकांच्या समज होईल. ज्यांनी गुन्हा केला अशांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे असे कोल्हे यांनी म्हटले आहे.

अंतिम निर्णय जयंत पाटील घेतील

गोंदिया-भंडारा विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गट नेमक्या किती जागा लढवणार यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की याबाबत बैठका सुरू आहेत आणि तिन्ही पक्ष मिळून जो काही निर्णय येईल त्यानुसार गोंदिया आणि भंडारामध्ये ‘भेल’ असो की ‘विमानतळ प्रकरण’ असो याबाबत जनतेने पाहिलेले आहे आणि म्हणूनच दोन्ही जिल्ह्यातील लोकांना पवार साहेबांवर विश्वास आहे आणि त्यानुसार जयंत पाटील अंतिम निर्णय घेतील असे कोल्हे यांनी म्हटले आहे.

त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.
लालबागचा राजा मंडपातून मार्गस्थ, शेवटच्या निरोपासाठी भक्तांची गर्दी
लालबागचा राजा मंडपातून मार्गस्थ, शेवटच्या निरोपासाठी भक्तांची गर्दी.
लालबागच्या राजाची निरोपापूर्वीची आरती, खास tv9 च्या प्रेक्षकांसाठी
लालबागच्या राजाची निरोपापूर्वीची आरती, खास tv9 च्या प्रेक्षकांसाठी.
वडील दादांसोबत सत्तेत अन् मुलं वेगळ्या दिशेनं? बापांचा प्लॅन बी तयार?
वडील दादांसोबत सत्तेत अन् मुलं वेगळ्या दिशेनं? बापांचा प्लॅन बी तयार?.
जरांगेंचं निवडणुकीच्या तोंडावर आमरण उपोषण, आरक्षण नाही तर पाडापाडी
जरांगेंचं निवडणुकीच्या तोंडावर आमरण उपोषण, आरक्षण नाही तर पाडापाडी.
जीभ छाटण्यापासून ते विष्ठेपर्यंत... टीका करताना नेत्यांचा तोल सुटला
जीभ छाटण्यापासून ते विष्ठेपर्यंत... टीका करताना नेत्यांचा तोल सुटला.
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.