खासदार कोल्हेंनी एकांतवासाचं ‘अनमोल’ गुपित उलगडलं; राजकीय संन्यास की उगवतीचा सूर्य, घ्या जाणून!

खासदार कोल्हे म्हणाले, आपल्याला पुरुषानं रडायचं नाही, त्यानं हळवं व्हायचं नाही हेच माहितंय. आपलं हळवेपण, भावना सार्वजनिक करायच्याच नाहीत. शिव्या देणं, कणखर असणं म्हणजेच पुरुष, असं शिकवलं गेलं. स्वप्न, आकांक्षा, गरजेच्या सीमारेषा पुसट झाल्या. आपण कशासाठी धावतोय, हेच विसरलो.

खासदार कोल्हेंनी एकांतवासाचं 'अनमोल' गुपित उलगडलं; राजकीय संन्यास की उगवतीचा सूर्य, घ्या जाणून!
डॉ. अमोल कोल्हे, खासदार.
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 1:13 PM

नाशिकः खासदार अमोल कोल्हे यांनी 7 नोव्हेंबर रोजी एक पोस्ट लिहिली आणि आपण एकांतवासात जात असल्याचं सांगितलं. यावरून अनेक चर्चा रंगल्या. थेट राजकीय संन्यास ते त्यांचं पक्षांतर. मात्र, या साऱ्या तर्कांना पूर्णविराम देत, अखेर अमोल कोल्हे यांनी स्वतःच आपल्या एकांतवासाचं गुपित उलगडलंय.

शंभूराजे – शिवरायांच्या पात्रांमध्ये जीव ओतून रमणारे, आपल्या दमदार अभिनयाने खिळवून ठेवणारे, राजकारणात स्वतःचं वेगळं क्षेत्र निर्माण करणारे खासदार अमोल कोल्हे एकांतवासात गेल्यानंतर चर्चा होणारच. या एकांतवासाचा अनेकांनी आपापल्या वकुबानुसार किस पाडला. अनेकांनी ना-ना तर्कवितर्क लढवले. या साऱ्यांना स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट करत खासदार अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले की, आपण माझी काळजी केली. अनेक जण माझ्या एकातंवासाच्या पोस्टवर व्यक्त झाले. मला मात्र, यातून एक जाणीव झाली. ती म्हणजे आपल्या मानसिक आरोग्याच्या जाणिवेची गरज. तुमच्या-माझ्यासारख्या माणसाला येणारा आणि दुर्लक्षिला जाणारा मानसिक थकवा. ही मला सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटली. आपण अनेक दुर्दैवी बातम्या ऐकतो. वयाच्या तिशीच ह्रदविकारानं मृत्यू, पस्तीशित मधुमेह. अस्थमा, डोकेदुखी वगैरे…वगैरे. या साऱ्या आजाराचे मूळ आपल्या मानसिकतेत आहे, असे एक डॉक्टर म्हणून कोल्हे यांनी स्पष्ट केलं. त्यांनी पुरुषांच्या भावनांचा पटच या भावनिक आवाहनातून उलगडला. ते पुढे म्हणाले, आपल्याला पुरुषानं रडायचं नाही, त्यानं हळवं व्हायचं नाही हेच माहितंय. आपलं हळवेपण, भावना सार्वजनिक करायच्याच नाहीत. शिव्या देणं, कणखर असणं म्हणजेच पुरुष, असं शिकवलं गेलं. स्वप्न, आकांक्षा, गरजेच्या सीमारेषा पुसट झाल्या. आपण कशासाठी धावतोय, हेच विसरलो. एकवेळ आपण धावताना थकतो. त्यावेळी शरीर थांबतं, पण मनाचं काय, असा सवाल त्यांनी यावेळी केला. त्याचं उत्तरही त्यांनी दिलं. ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागातून शहरात येणारा प्रत्येक जण विभक्त कुटुंबात स्थिरावतो. त्याला मन कुठं मोकळं करायचं हेच समजतं नाही. त्याच्या आत खूप काही साचत जातं. यातूनच मधुमेह, ह्रदयविकार इतर आजार जडतात. त्यामुळं व्यक्त व्हा, मोकळे व्हा. हे होताना स्वतःला कमकुवत समजू नका. कणखरपणा वगैरे वगैरे ही सारी बेगडी विशेषणं आहेत, असं आवाहनही त्यांनी केलं.

उगवतीचा सूर्य खासदार कोल्हे पुढे म्हणाले की, आपल्या भावनांचा निचरा होऊ द्या. खूप धावल्यानंतर थोडं थांबा. घडीभर विश्रांती घ्या. मी थांबलो तेव्हा अनेकांनी हा मावळतीचा सूर्य असल्याचं म्हटलं. आपण इतके निगेटिव्ह का झालोयत. आपली संस्कृती पाहा. हा मावळतीचा सूर्य नसून उगवतीचा सूर्य आहे. तुम्ही याचं अनुकरण केलं, की मानसिक ताण, मधुमेह आणि ह्रदयविकारापासून दूर व्हालच. मी अनेक विषयांवर चिंतन केलंय. त्यावर कालांतरानं व्यक्त होईन. मात्र, म्हणतात ना लोक सेलिब्रेटी आणि राजकारण्यांचं अनुकरण करतात. त्यामुळं मी सारं तुमच्यासाठी सांगतोय. तुम्ही हे अनुकरण केलेलं मला आवडेल. आपला मानसिक थकवा स्वीकारा. उरफुटेस्तोर धावण्याऐवजी थोडं थांबा. स्वतःत डोकावून पुन्हा उगवतीचा सूर्य घेऊन पुढे चाला. या वाटचालीत तुम्हाला साथ देण्यासाठी मी माझं यू ट्यूब चॅनल घेऊन येतोय, अमोल ते अनमोल, ही घोषणा करायलाही ते विसरले नाहीत. चला, तर मग. आपणही आपलं मानसिक आरोग्य जपू. खासदार आणि आपल्या लाडक्या अभिनेत्याचा आवाहनाला साद देऊ. (NCP MP Amol Kolhe revealed the secret of his solitude)

इतर बातम्याः

राऊतांचे वक्तव्य ऐकुण किव येते, राजकारणासाठी किती लाचारी; बाळासाहेब असते तर थोबाडीत दिली असती, चंद्रकांत पाटील यांचा घणाघात

मालेगाव भीषण शांत, माथेफिरूंनी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचे समोर, संशयितांची धरपकड

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....