केंद्र सरकार देशात हळूहळू आणीबाणी आणतंय; सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्ला
मेट्रो कारशेडच्या जमिनीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी पेटलेली असतानाच आता या वादात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उडी घेतली आहे.
मुंबई: मेट्रो कारशेडच्या (Metro car shed) जमिनीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी पेटलेली असतानाच आता या वादात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule ) यांनी उडी घेतली आहे. मिठागराची ती जागा राज्य सरकारचीच आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे एखाद्या राज्यातील जमिनीवर पहिला अधिकार हा त्या राज्याचाच असतो, असं सांगतानाच केंद्र सरकार सातत्याने राज्याचे अधिकार काढून देशात हळूहळू आणीबाणी आणत आहे, असा घणाघाती आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. (supriya sule criticizes BJP on Metro car shed)
‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करतानाच केंद्राच्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेधही नोंदवला आहे. केंद्र सरकारने मिठागराच्या जागेवर दावा केला आहे. ही त्यांचीच जमीन असल्याची धक्कादायक गोष्ट त्यांच्याकडूनच कळली. खरं तर ती जमीन महाराष्ट्राचीच आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे एखाद्या राज्यातील जमिनीवर त्या राज्याचा पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम करत आहे. त्यांच्या कृतीतूनच हे दिसत असून ही दुर्देवी घटना आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कांजूरमार्गमधील मिठागराची जमीन महाराष्ट्राची आहे. विकासकामासाठी तिचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजप कोणत्या आधारावर टीका करत आहे, असा सवाल करतानाच केंद्र सरकार या देशात हळूहळू आणीबीणी आणू पाहत आहे. सध्या तरी तसंच चित्रं दिसतंय, असंही त्या म्हणाल्या. (supriya sule criticizes BJP on Metro car shed)
अशी भाषा कधीच ऐकली नाही
यावेळी मंदिराच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. या राज्यात मंदिराचे टाळे तोडण्याची भाषा कधीच ऐकली नव्हती. आज अशी भाषा वापरली जाते हे दुर्देव आहे. सत्ता नसल्यामुळे कदाचित त्यांना काहीच सूचत नसेल. त्यामुळे ते बिचारे असे वागत असतील. त्यांचा समतोल ढासळला असावा, अशी बोचरी आणि खोचक टीकाही त्यांनी केली.
दिवाळीनंतर लग्नाचे हॉल उघडा
लग्नाचे हॉल उघडण्याची परवानगी देण्याची विनंती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने हॉल खुले करा. दिवाळीनंतर हॉल उघडा. पण त्याचे बुकिंग करण्यास आताच परवानगी द्या. त्यामुळे बँडवाले आणि कॅटर्सवाल्यांना दिलासा मिळेल, असंही त्या म्हणाल्या.
‘मेट्रोचं काम थांबवण्यासाठी भाजपचं कटकास्थान’, कारशेडच्या वादावरुन नवाब मलिकांचा गंभीर आरोपhttps://t.co/fNoh7pKWLA@nawabmalikncp @ShelarAshish @ramkadam #metro
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2020
संबंधित बातम्या:
‘मेट्रोचं काम थांबवण्यासाठी भाजपचं कटकारस्थान’, कारशेडच्या वादावरुन नवाब मलिकांचा गंभीर आरोप
मेट्रो कारशेडवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने
मुंबईत मेट्रो क्रेनचा भीषण अपघात, क्रेन अंगावर पडून महिलेचा मृत्यू
(supriya sule criticizes BJP on Metro car shed)