राष्ट्रवादीच्या बैठकीतील आतली बातमी, ‘झळ सोसली त्यांच्यावर अन्याय नको’, कार्यकर्त्यांची रोखठोक भूमिका

शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येतील का? याबाबत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना आणि चर्चांना उधाण येत असताना, आज महत्त्वाची घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. या बैठकीतील आतली बातमी सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या बैठकीतील आतली बातमी, 'झळ सोसली त्यांच्यावर अन्याय नको', कार्यकर्त्यांची रोखठोक भूमिका
राष्ट्रवादीच्या बैठकीतील आतली बातमी, 'झळ सोसली त्यांच्यावर अन्याय नको', कार्यकर्त्यांची रोखठोक भूमिका
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 4:50 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड पुकारल्यामुळे दीड वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. विशेष म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. स्वत: अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आपलं कुटुंब एकत्र यावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या इतर दिग्गज नेत्यांकडून शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र आले तर आपण स्वागतच करु, शरद पवार हे आपले दैवत असल्याच्या भावना त्यांच्याकडून मांडण्यात आल्या. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीतील इनसाईड स्टोरी सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे.

राष्ट्रवादीच्या बैठकीतील आतली बातमी काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत 2 महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. जर शरद पवारांसोबत असणारे लोक आपल्यासोबत येणार असतील तर आधी जे अजित पवारांसोबत निष्ठावान राहिले त्यांचा विचार करावा. त्यांना विविध संधी द्याव्यात, अशी कार्यकर्त्यांनी आजच्या बैठकीत मागणी केली. 2 जुलैला पक्षात फूट पडली त्यावेळी अजित पवारांवर विश्वास ठेऊन जे आले होते त्यांना टीकेचा सामना करावा लागला. त्यामुळे ज्यांनी टीकेची झळ सोसली. त्यांच्यावर अन्याय नको, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे मागील काही दिवसांत पक्षातलेच पदाधिकारी एकमेकांवर ज्या प्रकारे टीका करतात त्यावरून पक्षाची नाहक बदनामी होत आहे. ती बदनामी थांबायला हवी, अशी भावना वरिष्ठ पदाधिकाऱ्यानी त्यांच्या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काळात विधान परिषद उमेदवारी, विविध महत्त्वाची पदे देताना एकाच व्यक्तीचा विचार केला जातोय, अशी टीका पक्षातील एका नेत्यावर इतर पदाधिकारी यांनी केली होती. त्यावर आजच्या बैठकीच चर्चा झाली, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?.
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.