AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार पावसात भिजले आणि न्युमोनिया भाजपला झाला, राष्ट्रवादीचं गोपीचंद पडळकरांना सडेतोड प्रत्युत्तर

पवार साहेब पावसात भिजूनही राष्ट्रवादीचे केवळ 54 आमदार निवडूण आले, अशी टीका पडळकरांनी केली होती. त्याला आता राष्ट्रवादीनेही (NCP) खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

पवार पावसात भिजले आणि न्युमोनिया भाजपला झाला, राष्ट्रवादीचं गोपीचंद पडळकरांना सडेतोड प्रत्युत्तर
गोपीचंद पडळकरांना राष्ट्रवादीचे प्रत्युत्तरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 3:23 PM

मुंबई : गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पवारांच्या (Sharad pawar Raine speech) पावसातल्या सभेवरून जोरदार टोलेबाजी केली होती. पवार साहेब पावसात भिजूनही राष्ट्रवादीचे केवळ 54 आमदार निवडूण आले, अशी टीका पडळकरांनी केली होती. त्याला आता राष्ट्रवादीनेही (NCP) खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारसाहेब हे साताऱ्यातील प्रचारसभेत पावसात भिजले आणि निमोनिया भाजपला झाला असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे. भाजपला महाराष्ट्रात सत्ता काबीज करता आली नाही हे त्यांचे दुःख आम्ही समजू शकतो अशा शब्दात भाजपच्या दु:खावर महेश तपासे यांनी हल्लाबोल केला. साताऱ्यातील पावसाळी सभेत पवारसाहेबांनी आव्हान केले आणि त्याला महाराष्ट्रातल्या तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे गोपीचंद पडळकर विसरले असावेत याची आठवणही महेश तपासे यांनी करुन दिली आहे.

पवारांच्या नावाशिवाय प्रसिद्धी मिळत नाही

पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रसिद्धी मिळत नाही हे कळून चुकले आहे आणि म्हणूनच वारंवार पवारसाहेबांचे नाव घेऊन कुठेतरी प्रसिद्धी मिळविण्याची धडपड आहे अशी मिश्किल टीकाही महेश तपासे यांनी केली. हे सरकार स्थापन झाल्यापासून वारंवार महाविकास आघाडीतील नेते असतील, शरद पवार असतील ते महाराष्ट्रातील जनतेला सांगतात की भाजप सत्तेत येणार नाही. आम्ही पुढील 25 वर्षे सत्तेत राहणार असं ते म्हणतात. मला त्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडून आले. तर, शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. पावसात भिजून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले. तुम्ही पक्षाची स्थापना केल्यापासून पक्षाचा नेता मुख्यमंत्री करता आला नाही, असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते.

द काश्मीर फाईल्सवरूनही खोचक टोलेबाजी

तर द काश्मीर फाईल्सवरूनही भाजपवर राष्ट्रवादीने जोरदार टीका केली आहे. पूरातत्व शास्त्रज्ञांसारखे ‘भूतकाळ’ खोदण्यासाठी भाजप कार्यकर्ते कठोर परिश्रम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केला आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजप अनेक जुनी प्रकरणे उकरून काढून देशातील वातावरण कलुषित करण्याचे काम करत आहे. आताच ‘काश्मीर फाईल्स’ सिनेमावरुन जोरदार राजकारण भाजप करत असल्याचे क्लाईड क्रास्टो म्हणाले. दरम्यान भाजप सध्या पूरातत्व विभागासारखे दिसू लागले आहे. पूरातत्व विभाग ज्याप्रमाणे खोदकाम करून अनेक जुन्या गोष्टी काढतात तशापध्दतीने भाजप कामाला लागले असल्याचा हल्लाबोल क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.

MIM बाबत राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय? सुप्रिया सुळे म्हणतात विकासासाठी…

हा देवेंद्र फडणवीसांचा B Plan!! MIM ला घुसवून महाविकास आघाडी तोडण्याचा डाव, औरंगाबादेत Khaire यांचा आरोप

शिवसेनेने हिंदुत्वाची चादर बाजूला टाकली, Uddhav Thackeray उद्या ‘आयसीस’शीही चर्चा करतील; नितेश राणेंची टीका

भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्...
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्....
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?.
HSC : ऑल द बेस्ट पोरांनो, बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?
HSC : ऑल द बेस्ट पोरांनो, बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?.
जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल
जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल.
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली.
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू.
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप.
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.