NCP Sharad Pawar Candidate List : सर्वात मोठी बातमी! शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाकुणाला संधी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून बारामती मतदारसंघातून कुणाला उमेदवारी देण्यात येईल? या प्रश्नाचंही उत्तर मिळालं आहे. शरद पवार बारामतीत मोठा गेम खेळणार आहेत. शरद पवार गटाकडून पहिल्या यादीत एकूण 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

NCP Sharad Pawar Candidate List : सर्वात मोठी बातमी! शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाकुणाला संधी
शरद पवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 6:55 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे. बारामतीमधून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार यांच्यात आता थेट लढत बघायला मिळणार आहे. याआधी लोकसभेतही राष्ट्रवादीच्या पवार कुटुंबातीलच नणंद-भावजयी यांच्यात लढत बघायला मिळाली होती. आता बारामती विधानसभेत काका-पुतण्यात राजकीय लढाई होणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी ही लढाई कठीण असणार आहे.

शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत मेहबूब शेख, राणी लंके, भाग्यश्री आत्राम, रोहित पाटील अशा नावांचा समावेश आहे. शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील, सररजित घाटगे, उदगीरचे सुधाकर भालेकर यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हे तीनही नेते भाजपमधून शरद पवार गटात आले आहेत. तसेच खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुक्ताईनगरमधून आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

वाचा उमेदवारांची यादी

  1. इस्लामपूर – जयंत पाटील
  2. काटोल – अनिल देशमुख
  3. घनसावंगी – राजेश टोपे
  4. कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
  5. मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
  6. कोरेगाव – शशिकांत शिंदे
  7. बसमत – जयप्रकाश दांडेगावकर
  8. जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
  9. इंदापूर – हर्षवर्धन पाटील
  10. राहुरी – प्राजक्त तनपुरे
  11. शिरुर – अशोक पवार
  12. शिराळा – मासिंगराव नाईक
  13. विक्रमगड – सुनील भुसारा
  14. कर्जत – जामखेड – रोहित पवार
  15. अहमदपूर – विनायकराव पाटील
  16. सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
  17. उदगीर – सुधाकर भालेराव
  18. भोकरदन – चंद्रकांत दानवे
  19. तुमसर – चरण वाघमारे
  20. किनवट – प्रदीप नाईक
  21. जिंतूर – विजय भामरे
  22. केज – पृथ्वीराज साठे
  23. बेलापूर – संदीप नाईक
  24. वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे
  25. जामनेर – दिलीप खोडपे
  26. मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
  27. मूर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
  28. नागपूर पूर्व – दिनेश्वर पेठे
  29. किरोडा – रविकांत गोपचे
  30. अहिरी – भाग्यश्री आत्राम
  31. बदनापूर – बबलू चौधरी
  32. मुरबाड – सुभाष पवार
  33. घाटकोपर पूर्व – राखी जाधव
  34. आंबेगाव – देवदत्त निकम
  35. बारामती – युगेंद्र पवार
  36. कोपरगाव – संदीप वरपे
  37. शेवगाव – प्रताप ढाकणे
  38. पारनेर – राणी लंके
  39. आष्टी – मेहबूब शेख
  40. करमाळा – नारायण पाटील
  41. सोलापूर शहर उत्तर – महेश कोठेे
  42. चिपळूण – प्रशांत यादव
  43. कागल – समरजीत घाटगे
  44. तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील
  45. हडपसर – प्रशांत जगताप

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...