शरद पवार गटात मोठा भूकंप, पक्षाच्या ‘लेडी जेम्स बॉन्ड’चे सुप्रिया सुळे यांच्यावरच गंभीर आरोप
शरद पवार गटात मोठा राजकीय भूकंप आल्याचे संकेत जाणवत आहे. कारण शरद पवार यांच्या अतिशय विश्वासातील तरुण नेत्या सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न निर्माण होतोय.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तरुण तडफदार नेत्या सोनिया दुहान यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप ऐकल्यानंतर शरद पवार गटात नेमकं काय चाललं आहे? असा प्रश्न निर्माण होतोय. सोनिया दुहान यांनी माध्यमांसमोर येऊन सुप्रिया सुळे यांच्याविरोधात धक्कादायक वक्तव्य केलं आहे. सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बून शकल्या नाहीत, असं सोनिया दुहान म्हणाल्या आहेत. सुप्रिया सुळे यांच्या बाजूचे लोक कारस्थान रचत आहेत, असा आरोप सोनिया दुरान यांनी केला आहे. नेत्यांना पक्षातून हटवण्याचं काम सुरु आहे, असादेखील आरोप सोनिया दुहान यांनी केलाय. त्यामुळे मी लवकरच शरद पवार गट सोडणार असल्याचं सोनिया दुहान यांनी म्हटलं आहे.
“सर्व लोक म्हणजे मी असेल, धीरज शर्मा सारखे लोक असतील, आमच्या सर्वांसाठी शरद पवार हे नेते होते, आहेत आणि कायम राहतील. आमची पूर्ण एकनिष्ठता शरद पवार यांच्यासोबत आहे. आमच्या ज्या खासदार आहेत, ज्या वर्किंग कमिटीच्या अध्यक्षा आहेत, शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा खूप सन्मान आहे. शरद पवार यांच्या कन्या म्हणून त्यांचा आदर आहे. पण सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांमुळे आमच्यासारखे जे एकनिष्ठ लोक आहेत, जे शरद पवार यांच्यासाठी काहीही करायला तयार आहेत, ते लोक निर्णय घेत आहेत आणि पक्षाला सोडून जात आहेत”, असा दावा सोनिया दुहान यांनी केला.
“मी आजपर्यंत पक्ष सोडलेला नाही. पण मी खूप लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहे. मी दुसरा कोणत्या पक्षात प्रवेश करणार नाही. तुम्हाला वाटेल की, मी उद्या अजित पवार गट, भाजप किंवा काँग्रेस पक्षात जाईन, तर तसं नाही. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी सध्या कोणताच निर्णय घेणार नाही. मी सध्या एकनिष्ठतेने बसले आहे. सुप्रियाताईंच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे पक्षाचं काम करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचं, हटवण्याचं आणि मजबूर करण्याचं काम करत आहेत. पक्ष सोडावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत”, असा गंभीर आरोप सोनिया दुहान यांनी केलाय.
सोनिया दुहान कोण आहेत?
सोनिया दुहान या हरियाणाच्या राष्ट्रवादी (शरद पवार गट) विद्यार्थी संघटना अध्यक्षा आहेत. सोनिया दुहान यांची ओळख राष्ट्रवादीतल्या लेडी जेम्स बॉन्ड म्हणून आहे. जेव्हा शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीहून गोव्यात मुक्कामी आले, तेव्हा त्यांच्या संपर्कासाठी सोनिया दुहान आणि इतर 3 पदाधिकारी गोव्यातल्या हॉटेलमध्ये शिरले होते. पण त्यांचा प्रयत्न अयश्वशी ठरला.
अजित पवारांच्या पहाटेच्या बंडावेळी नरहरी झिरवाळांसह राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना दिल्लीजवळच्या गुरुग्रामधल्या एका हॉटेलमध्ये ठेवलं गेलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, त्या हॉटेलबाहेर पहाऱ्यासाठी भाजपचे दीडशे कार्यकर्ते होते. त्या हॉटेलमध्ये धुडगूस घालून राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना पुन्हा मुंबईत आणणाऱ्या सोनिया दुहानच होत्या.