चाळीसगावात महाविकास आघाडीत बिघाडी, उन्मेष पाटील यांची उमेदवारी धोक्यात?

ठाकरे गटाने उन्मेष पाटील यांना एबी फॉर्म दिल्याने शरद पवार गटात नाराजी निर्माण झाली आहे. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी ही जागा राष्ट्रवादीची असल्याचा दावा केला आहे. आपण मुंबईतील नेत्यांशी चर्चा करण्यासाठी जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे उन्मेष पाटील यांची उमेदवारी धोक्यात येते का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

चाळीसगावात महाविकास आघाडीत बिघाडी, उन्मेष पाटील यांची उमेदवारी धोक्यात?
उन्मेष पाटील
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 9:49 PM

खेमचंद कुमावत, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : चाळीसगावात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांना पक्षाकडून चाळीसगाव विधानसभेतून उमेदवारी जाहीर करत एबी फॉर्म दिल्याची माहिती पाटील यांच्या कुटुंबियांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली. यानंतर चाळीसगाव विधानसभेच्या जागेवरून आता शिवसेना ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये वाद बघायला मिळत आहे. चाळीसगावातील शरद पवार गटाचे माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील हे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.

“चाळीसगाव विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीच आहे. माजी आमदार राजीव देशमुख यांनी माझ्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. चाळीसगाव विधानसभेची जागा मी लढवावी यासाठी मला आग्रह केलेला आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. चाळीसगाव विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षालाच मिळेल”, अशी भूमिका प्रमोद पाटील यांनी मांडली आहे.

प्रमोद पाटील यांचा नेमका दावा काय?

“टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून माहिती मिळाली की, उन्मेष पाटील एबी फॉर्म घेऊन आले. अजून जागा वाटपाची घोषणाचं नाही तर उन्मेष पाटील एबी फॉर्म कसं काय घेऊन आले? याचं आम्हाला आश्चर्य वाटत आहे. उन्मेष पाटील यांच्या परिवारातील सदस्यांनी भूमिका मांडली की, आम्ही राजू देशमुखांचे आभार मानतो. पण राजीव देशमुख ही जागा माझ्यासाठीच मागत आहेत”, असं प्रमोद पाटील म्हणाले.

“टीव्ही 9 मराठीची बातमी ऐकल्यानंतर आम्ही सर्वजण मुंबईला जायला निघालो आहोत. चाळीसगाव विधानसभेची जागा राष्ट्रवादीलाच मिळावी ही भूमिका माजी आमदार राजीव देशमुख यांची स्पष्ट आहे. असं असताना अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणे याचं मला मोठं आश्चर्य वाटत आहे. चाळीसगाव विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीचीच आहे एवढेच मी या निमित्ताने सांगतो”, असं शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील म्हणाले.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.