शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तीन नावांचा प्रस्ताव आयोगाला पाठवण्यात आला आहे. यापैकी एका नावावर निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करणार आहे.

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला 'या' तीन नावांचा प्रस्ताव, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी
शरद पवार
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 4:33 PM

नवी दिल्ली | 7 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निकालात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. तर शरद पवार यांच्या गटाला आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला तीन नावांचा आणि चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश देण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या या आदेशानुसार शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन नावाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यातील पहिलं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, दुसरं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, तिसरं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – एस असं निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे.

चिन्हाचा प्रस्ताव पाठवला गेला नाही

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असला तरी त्यांच्याकडून तीन चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. यामागेदेखील एक कारण आहे. राज्यसभेच्या निवडणुकीला चिन्हाचा वापर होत नाही. त्यामुळे शरद पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्हाचा फोटो पाठवण्यात आलेला नाही.

शरद पवार गटाचं दिल्लीत शक्तीप्रदर्शन

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता दिल्लीत शरद पवार गटात हालचाली वाढल्या आहेत. शरद पवार गटाकडून दिल्लीत आमचा पक्ष, आमचं चिन्ह अशा अशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शरद पवार हे स्वत: आता संवाद साधणार आहेत. शरद पवार गटाच्या इतर नेत्यांकडून निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. पण शरद पवार यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे शरद पवार नेमकं काय म्हणतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.