AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे सेटिंगवाला पक्ष, शरद पवार गटाच्या नेत्याने डिवचलं

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अमित सरय्या यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. मनसेचं काही राहिलेलं नाही, मनसे हा सेटिंग वाला पक्ष आहे अशी टीका सरय्या यांनी केली आहे.

मनसे सेटिंगवाला पक्ष, शरद पवार गटाच्या नेत्याने डिवचलं
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 12:54 PM

महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवार यांनी सुरुवात केली, असा मोठा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केला होता. मात्र त्यांचं हे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रुचलं नाही. आता मनसेकडून कोकण पदवीधर मतदार संघातून माघार घेण्यात आली आहे. त्याच पार्श्भूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अमित सरय्या यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. मनसेचं काही राहिलेलं नाही, मनसे हा सेटिंग वाला पक्ष आहे अशी टीका सरय्या यांनी केली आहे.

कोकण पदवीधर मतदार संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून संजय मोरे,भाजप कडून निरंजन डावखरे,राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमित सरय्या रिंगणात उभे आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमित सरय्या हेदेखील ही निवडणूक लढवणार आहेत. त्यासंदर्भात बोलताना सरय्या यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मनसेचं काही राहिलेलं नाही. मनसे हा सेटिंग वाला पक्ष आहे. मनसेच्या या भूमिकेवर लोक नाराज आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ( या निवडणुकीसाठी) कामं सुरू केली होती, पण आता माघार घेतल्याने त्यांना इतकं वाईट वाटत आहे. सकाळपासून अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क झाला, ते बोलले आम्ही त्यांचं काम करणार नाही तुम्हाला पाठिंबा देऊ, असं सरय्या म्हणाले.

उमेदवारीबाबत काय म्हणाले अमित सरय्या ?

गेली आठ महिने आम्ही नोंदणी करत आहोत. आमचा प्रत्येक कार्यकर्ता सिंधुदुर्ग ते पालघर या पाच जिल्ह्यात काम करत आहे. नोंदणी व्यवस्थित झाली आहे. महविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शरद पवार यांच्या ताकदीने ही निवडणूक लढवत आहे. आघाडीमधे काही बिघाड झालेला नाही. इथे एकच उमेदवार असेल, वरिष्ठ पातळीवर नेत्यांचे बोलणे सुरू आहे , असे त्यांनी सांगितले.

महागाई आणि बेरोजगारी या दोन मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहे. संविधान बदलण्याचा त्यांचा कट इंडिया आघाडीने हाणूम पाडलेला आहे. बेरोजगार जनता भाजपासोबत नाही. मागील 10 वर्षात यांनी कोणतेही धोरण राबविले नाही, अशी टीका त्यांनी केली.

मनसेच्या माघारीचा फायदा महायुतीला

मनसेकडून कोकण पदवीधर मतदार संघातून माघार घेतल्याने याचा फायदा महायुतीला होणार असल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमित सरय्या हे देखील मैदानात उतरलेले आहेत.शिवसेना शिंदे गटाकडून संजय मोरे यांनी देखील पदवीधर मतदार संघातून अर्ज भरला आहे.कोकण पदवीधर मतदार संघ हा महायुतीचा बालेकिल्ला समजला जातो त्यामुळे यंदा बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनसेच्या दिलजमाईमुळे महायुतीचे पारडे जड मानण्यात येत आहे.

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.