‘सागर’ बंगल्यावर हालचाली वाढल्या, शरद पवारांचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे फडणवीसांच्या भेटीला

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत असलेली अनिश्चितता कायम आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर अनेक नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळ्या मामा म्हात्रे यांच्या भेटीने राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

'सागर' बंगल्यावर हालचाली वाढल्या, शरद पवारांचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे फडणवीसांच्या भेटीला
शरद पवारांचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे फडणवीसांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 5:35 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्याआधी हालचालींना वेग आला आहे. राज्यात नव्या सरकारचा शपथविधी हा येत्या 5 डिसेंबरला होणार आहे. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत भाजपकडून अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. अर्थात भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे खरे दावेदार आहेत. कदाचित तेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील किंवा तशी दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज अनेक दिग्गज नेत्यांनी दाखल होत त्यांची भेट घेतली आहे. या भेटीगाठींचा अर्थ नेमका काय घ्यायचा? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. कदाचित देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, भाजपचा विधीमंडळ नेता ठरवण्यासाठी भाजपचे दोन निरीक्षक उद्या राज्यात येणार आहेत. यावेळी भाजपचा विधीमंडळ नेता आणि गटनेता ठरवला जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

या सर्व भेटीगाठी आणि घडामोडी सुरु असताना एक महत्त्वाची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आज ‘सागर’ बंगल्यावर दाखल झाले. त्यांनी सदिच्छा भेट घेतल्याचं सांगितलं आहे. पण या भेटीचा सविस्तर तपशील अद्याप समोर येऊ शकलेला नाही. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या पक्षात काही नेते प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. असं असताना आज बाळ्या मामा म्हात्रे यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

बाळ्या मामा म्हात्रे यांनी भाजपचे दिग्गज नेते कपिल पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला आहे. त्यामुळे बाळ्या मामा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष आहे. याबाबत आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. “बाळा मामा यांच्या मतदारसंघात गुन्हेगारी वाढली असेल म्हणून ते भेटले असतील, मात्र आमचे आमदार कुठेही संपर्क करत नाहीयत, जर असं कुणी काही करत असेल तर ते लोकांना आवडणार नाही”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक दिग्गज नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट

देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर हालचाली वाढल्या आहेत. अनेक नेत्यांनी सागर बंगल्यात दाखल होत फडणवीसांची भेट घेतली आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, गिरीश महाजन, शिंदे गटाचे राजेंद्र राऊत, राष्ट्रवादीचे प्रताप पाटील चिखलीकर, खासदार अनिल बोंडे यांनी सागर बंगल्यावर दाखल होत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर नेत्यांची अक्षरश: रिघ लागली आहे. या नेत्यांचं मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु असल्याची चर्चा आहे. भाजप आमदार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनीदेखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.