ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, पंढरपूर मंदिरात दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश

पंढरपूरात दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, पंढरपूर मंदिरात दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 5:27 PM

पंढरपूर : येत्या सोमवारी (16 नोव्हेंबर) पाडव्यापासून राज्यातील मंदिरं उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. ठाकरे सरकारच्या या दिवाळी गिफ्टमुळे भक्तांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे. पण मंदिरं खुली करताना प्रत्येक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. याचं सरकारच्या गाडलाइन्स लक्षात घेत पंढरपूर मंदिरही आता भाविकांसाठी खुलं होणार आहे. त्यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये उत्साह पसरला आहे. (Need online booking for vitthal darshan in pandharpur 1000 devotees enter Pandharpur temple every day)

मिळालेल्या माहितीनुसार, श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. पंढरपूरात दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 65 वर्षावरील आणि 10 वर्षापर्यंतच्या मुलांना दर्शनास बंदी घालण्यात आली आहे. नित्योपचाराचा वेळ वगळता उरलेल्या वेळात दर एक तासाला शंभर लोकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवास देण्यात येईल असा निर्यम मंदिर प्रशानसनाकडून घेण्यात आला आहे.

यामध्ये भाविकांना श्री विठ्ठलाचे फक्त मुख दर्शन मिळणार आहे. शासनाच्या गाइडलाइननुसारच दर्शन देणार असल्याची भूमिका मंदिर प्रशासनानं घेतली आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर आज 5 वाजता मंदिर समितीचि बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रार्थनास्थळे खुली केल्यानंतर सर्वांना नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा आणि स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका, असे काही नियम यात नमूद करण्यात आले आहे.

शिर्डीतील साई मंदिरात सोमवारपासून 6 हजार भाविकांना दर्शनाची सोय शिर्डीतील साईमंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्या भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करुन ठेवलेले आहे; त्यांनीच शिर्डीत यावे असे आवाहनदेखील साईबाबा संस्थानतर्फे करण्यात आले आहे. (The Sai Mandir in Shirdi will be open for Darshan from Monday)

सोमवारी (16 नोव्हेंबर) पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई मंदिरदेखील दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. मागील आठ महिन्यांपासून राज्यातील सर्व मंदिरं बंद होती. त्यानंतर आता साईबाबा संस्थानने सोमवारपासून दररोज 6 हजार भाविक दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था केली आहे.

मात्र, साईदर्शनासाठी यायचे असेल तर, त्यासाठी भाविकांना आगाऊ ऑनलाईन बुकिंग करावे लागेल. तसेच ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलेले असेल त्यांनीच शिर्डीत यावे, कोरोना प्रतिबंधंक सर्व नियम पाळावेत, असे आवाहन साईबाबा संस्थेने केले आहे.

इतर बातम्या – 

Temple Reopen | राज्यातील मंदिरं उघडण्यासंर्दभातील नियमावली

भाजपने सरकारचे डोळे उघडले; म्हणूनच मंदिराचे दार उघडले; नितेश राणेंचं टीकास्त्र

(Need online booking for vitthal darshan in pandharpur 1000 devotees enter Pandharpur temple every day)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.