Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi | Online च्या जमान्यात हजारो Disturbance , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला विद्यार्थ्याना थेट उपाय!

माध्यम ऑनलाइन असो वा ऑफलाइन असो. मात्र माझं मन पूर्णपणे अभ्यासात व्यग्र आहे. माझी जी शोधक वृत्ती आहे, ती विषयातल्या बारकाव्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. असं समजलं तर तुमच्यासाठी ऑनालइन किंवा ऑफलाइन कोणत्याही पद्धतीने शिकलं तरी काहीही फरक पडणार नाही.

PM Modi | Online च्या जमान्यात हजारो Disturbance , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला विद्यार्थ्याना थेट उपाय!
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 12:40 PM

नवी दिल्ली | सध्या डिजिटल क्रांतीमुळे (Digital Revolution) ऑनलाइन (Online Exam) पद्धतीने शिक्षण घेण्याचे युग आहे. मात्र शिकण्यासाठी मोबाइल किंवा लॅपटॉप घेतला की युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारखे हजारो डिस्टर्बन्स येतात. या सगळ्यांमुळे मन विचलित होतं आणि अभ्यासावर कमी लक्ष जातं. अशा अडथळ्यानंतरही अभ्यासावर कसं लक्ष केंद्रित करायचं, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना विचारण्यात आला. नवी दिल्ली येथे आयोजित परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात देशातील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. ऑनलाइनच्या जमान्यात येणाऱ्या हजारो अडथळ्यांवर कशी मात करायची याचं उत्तरही त्यांनी अगदी सविस्तर पणे दिलं..

ऑनलाइन रीड करते हो की रील देखते हो?

ऑनलाइनच्या जमान्यात अभ्यासावर फोकस कसं करायचं या प्रश्नाचं उत्तर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनाच एक प्रश्न विचारून कोंडीत पकडलं. ते म्हणाले, ते म्हणाले, ‘ ऑनलाइन रीड करते समय आप रीड करते हो की रील देखते हो? मै आप को हाथ उपर कर ने को नही बोलूंगा..’ मोदींनी विचारलेल्या या प्रश्नावर विद्यार्थी खळखळून हसले. मात्र या प्रश्नाचा प्रत्येक विद्यार्थ्याने गांभीर्याने विचार करायला पाहिजे, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

‘माध्यम नव्हे तर मनाची खरी समस्या आहे’

अडथळे आणणाऱ्या हजारो माध्यमांमुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित होते, असे नेहमी म्हटले जाते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, खरी समस्या माध्यम नाही तर मन ही समस्या आहे. माध्यम ऑनलाइन असो वा ऑफलाइन असो. मात्र माझं मन पूर्णपणे अभ्यासात व्यग्र आहे. माझी जी शोधक वृत्ती आहे, ती विषयातल्या बारकाव्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. असं समजलं तर तुमच्यासाठी ऑनालइन किंवा ऑफलाइन कोणत्याही पद्धतीने शिकलं तरी काहीही फरक पडणार नाही.

युगं बदलतात, माध्यमं बदलतात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘ युग बदलते, तशी माध्यमंही बदलत आहेत. पूर्वी सर्व शिक्षण कंठस्थ असे. श्रवणशक्तीद्वारेच अनेक पिढ्यांनी शिक्षण आत्मसात केले. नंतर छपाईचं युग आलं तेव्हा लोकांनी त्यात स्वतःला बदलून घेतलं. ही क्रांती सातत्याने सुरुच असते. आज आपण डिजिटल माध्यमातून, नव्या तंत्रज्ञानाच्या टूल्सद्वारे शिकत आहोत. हे एक व्यापक युग आहे. ही आपण संधी म्हणून स्वीकारले पाहिजे. समस्या म्हणून याकडे पाहू नये. ऑनलाइन शिक्षण एक रिवॉर्ड म्हणून पहा. शिक्षकांच्या नोट्स आणि ऑनालइन शिक्षणातील नोट्स पडताळून पाहिल्यास तुम्हाला काहीतरी नवं सापडेल. त्यातून तुमची ताकद वाढेल, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

इतर बातम्या-

व्हॅट कपातीमुळे मोठा दिलासा, राज्यात CNG 6 रुपयांनी तर PNG 3.5 रुपयांनी स्वस्त

Satish Uke अटक प्रकरण : हे तर भाजपचं बदनाम करण्याचं षडयंत्र, नाना पटोले यांची टीका

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.