Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता परीक्षेच्या आदल्यादिवशीही प्रवेश अर्ज करा, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली काय? वाचा सविस्तर

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या आदल्या दिवशीही अर्ज करता येणार आहे. याबाबत सविस्तर लेखी आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं काढले आहेत.

आता परीक्षेच्या आदल्यादिवशीही प्रवेश अर्ज करा, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली काय? वाचा सविस्तर
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 7:55 PM

मुंबई : राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणार एक मोठा निर्णय घेतला आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या आदल्या दिवशीही अर्ज करता येणार आहे. परीक्षेचा अर्ज भरण्याचे विलंब शुल्क माफ केलं आहे, नियमित शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतलं जाणार आहे. राज्य सरकारने परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची विद्यार्थ्यांना परवानगी दिली आहे, त्यामुळे परीक्षेला मुकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

4 मार्चपासून बारावीची, 15 मार्चपासून दहावीची परीक्षा

येत्या 15 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. कोरोनाकाळात दहावीच्या परीक्षा दोन वर्षे रद्द झाल्या आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा देणार आहेत, दोन वर्षे विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारे पास करण्यात आले होते. बारावीची परीक्षा येत्या 4 मार्चपासून सुरू होणार आहे. यात उशीरा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना आधी विलंब शुल्क भरावे लागत होते, मात्र आता विलंब शुल्कही सरकारकडून माफ करण्यात आले आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून नियमीत शुल्क घेतले जाणार आहे. याबाबत सविस्तर लेखी आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं काढले आहेत.

दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर

याआधीच बोर्डाकडून आणि शिक्षणमंत्र्यांकडून दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रक वेळीच जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना तयारीसाठी व्यवस्थित वेळ मिळणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातल्या शाळा कोरोनामुळे बंद होत्या. मात्र मागील काही दिवसात कोरोनाचे आकडे कमी झाल्यानंतर राज्यातल्या शाळा सुरू करण्यात आल्या. आता पुन्हा ओमिक्रॉनने विद्यार्थी आणि पालकांची धास्ती वाढवली आहे, मात्र 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होणार असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांची धाकधूक कमी होणास निश्चितच मदत होणार आहे.

Sudhir Mungantivar: महाविकास आघाडी सरकार म्हणजे चेहरा लोकशाहीचा, कृती हुकूमशाहीची; सुधीर मुनगंटीवार यांचा आरोप

Corona : मुंबईकरांना धडकी, कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ, एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे रुग्ण

VIDEO : Salman Khan चालवतोय ऑटोरिक्षा, पनवेलमधला व्हिडिओ Viral

धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं.
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.