Night Curfew Guidelines : दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी! केव्हा काय सुरु आणि काय बंद? वाचा तुमच्या कामाची बातमी
शनिवारी संध्याकाळी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. ही नियमावली 10 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत लागू असेल. त्यात राज्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी आदेश लागू केले आहेत. तसंच सरकारी, खासगी कार्यालये आणि विविध आस्थापना, दुकाने, मॉल्स आदींसाठी नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्यात काय सुरु आणि काय बंद राहणार, हे पाहणं महत्वाचं आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) अधिक वेगानं वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या (Corona Patients) झपाट्याने वाढतेय. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारनं कठोर निर्बंध (Corona Restrictions) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारकडून (Mahavikas Aghadi) शनिवारी संध्याकाळी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. ही नियमावली 10 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत लागू असेल. त्यात राज्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी आदेश लागू केले आहेत. तसंच सरकारी, खासगी कार्यालये आणि विविध आस्थापना, दुकाने, मॉल्स आदींसाठी नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्यात काय सुरु आणि काय बंद राहणार, हे पाहणं महत्वाचं आहे.
राज्यात काय सुरु?
- लोकल, बसेस
- सर्व सार्वजिनिक वाहतूक
- माल वाहतूक
- बँका
- भाजी मार्केट
- दूध डेअरी
- किराणा दुकान
- बेकरी
- सरकारी, खासगी कार्यालये
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात काही आवश्यक निर्बंध लावण्यात आले आहेत pic.twitter.com/3uUnrWuo6D
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 8, 2022
काय बंद राहणार?
- मनोरंजन पार्क
- प्राणी संग्रहालय
- म्युझियम
- स्विमिंग पूल
- जीम
- स्पा, ब्युटी पार्लर
- किल्ले
कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका- मुख्यमंत्र्यांचे जनतेला कळकळीचे आवाहन. राज्यात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी नवे निर्बंध लागू. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या.… यासह इतर #महत्त्वाच्याबातम्या पाहा.#TodaysNews #GovtNews #GovtOfMaharashtra pic.twitter.com/JfgMEE6jmf
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 8, 2022
संपूर्ण नियमावली थोडक्यात
>>महाराष्ट्रात सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत संचारबंदी
>> 5 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येता येणार नाही
>> महाराष्ट्रात रात्री 11 ते प. 5 वा. पर्यंत नाईट कर्फ्यू
>> शाळा आणि कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार
>> सार्वजनिक वाहतुकीत दोन्ही डोस घेतलेल्यांना परवानगी
10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना मुभा राहिल
>> लग्न समारंभासाठी 50, अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी
>> सामाजिक, धार्मिक कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी
>> खासगी कार्यालयांमध्ये 50 % उपस्थितीची परवानगी
>> दोन्ही डोस घेतलेल्यांनाच कार्यालयांमध्ये येण्याची मुभा
>> स्वीमिंग पूल, जीम, स्पा, ब्युटी पार्लर बंद
>> सलूनमध्ये 50 % उपस्थितीत रात्री 10 पर्यंत परवानगी
>> मनोरंजन पार्क, प्राणी संग्रहालय, म्युझियम बंद
>> शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स 50 % क्षमतेनं सुरु
>> थिएटर, नाट्यगृह 50 %क्षमतेनं सुरु
>> तारखा जाहीर झालेल्या सर्व परीक्षा होणार
इतर बातम्या :