निलेश आणि नितेश राणेंचं काठावर मतदान, दोघेही वेळ संपताना मतदान केंद्रात
सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मतदान केलं. त्यांनी कणकवली मध्ये मतदानाचा हक्क बजावला. निलेश राणे मतदान करून बाहेर पडत असतानाच त्यांचे बंधू काँग्रेसचे आमदार नितेश राणे हे ही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांनीही उशिरा मतदानाचा हक्क बजावला. “शिवसेनेला कंटाळलेली कोकणी जनता आपल्यालाच विजयी करेल” असा […]
सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मतदान केलं. त्यांनी कणकवली मध्ये मतदानाचा हक्क बजावला. निलेश राणे मतदान करून बाहेर पडत असतानाच त्यांचे बंधू काँग्रेसचे आमदार नितेश राणे हे ही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांनीही उशिरा मतदानाचा हक्क बजावला.
“शिवसेनेला कंटाळलेली कोकणी जनता आपल्यालाच विजयी करेल” असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला. तर आमदार नितेश राणे यांनी विजयाचा दावा करताना फक्त औपचारिकता शिल्लक असल्याचे सांगितले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील लढत
रत्नागिरी सिंधुदुर्गातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून माजी खासदार डॉ. निलेश राणे, शिवसेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत, तर काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांची लढत होत आहे. मात्र, मुख्य लढत निलेश राणे विरुद्ध विनायक राऊत अशीच असेल. ‘राणे विरुद्ध शिवसेना’ अशा सामन्याचीही किनार या लढतीला आहे.
संबंधित बातम्या
मतदानाच्या दोन दिवस आधीच राणेंच्या पक्षाला रत्नागिरीत मोठं खिंडार
आम्हाला ‘खासदार’ हवाय, ‘गुंड’ नकोय, उद्धव ठाकरेंचा निलेश राणेंवर हल्लाबोल