‘कधी CD निघाली तर तुमचे वांदे होतील!’ निलेश राणेंचा धनंजय मुंडेंना काळजी करण्याचा सल्ला

काल धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बोलताना ईडीची किंमत शेतकऱ्यांच्या खिशातल्या विडीसारखी झालीय, अशी टीका भाजवर केली होती. त्यालाच आता तुमची पर्सनल सीडी बाहेर आली तर वांदे होतील असा इशारा निलेश राणे  (Nilesh Rane) यांनी दिलाय.

'कधी CD निघाली तर तुमचे वांदे होतील!' निलेश राणेंचा धनंजय मुंडेंना काळजी करण्याचा सल्ला
निलेश राणेंचा धनंजय मुंडेंना इशाराImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 9:07 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात केंद्रीय तपास यंत्रणा ईडीवरून (ED) सध्या चांगलाच वाद सुरू आहे. केंद्र सरकार ईडीची वापर करून राज्यातल्या नेत्यांच्या मागे चौकशा लावत असल्याचा आरोप महाविकास आघाडी करत आहे. तर दुसरीकडे पोलिसांचा गैरवापर राज्य सरकरा करत असल्याचा आरोप भाजप करत आहे. नारायण राणे अटक प्रकरण, नितेश राणे अटक प्रकरण, आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल, अशा अनेक प्रकरणात महाविकास आघाडीवर आरोप होत आहेत. तर दुसरीकडे अनिल देशमुख, नवाब मलिक यांना झालेल्या अटकेवरून आणि इतर नेत्यांच्या चौकशीवरू केंद्रावर आरोप होत आहेत. काल धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बोलताना ईडीची किंमत शेतकऱ्यांच्या खिशातल्या विडीसारखी झालीय, अशी टीका भाजवर केली होती. त्यालाच आता तुमची पर्सनल सीडी बाहेर आली तर वांदे होतील असा इशारा निलेश राणे  (Nilesh Rane) यांनी दिलाय.

निलेश राणेंचे ट्विट

तुमचे वांदे होतील-राणे

निलेश राणे यांनी धनंजय मुंडेना टोला लगावताना,  धनंजय मुंडे आपण ED आणि BD ची चिंता करू नका, तुम्ही तुमच्या खाजगी कार्यक्रमाची कधी CD निघाली तर तुमचे वांदे होतील त्याची काळजी करा, असे ट्विट केले आहे. त्याच्या बोलण्याचा थेट रोख हा धनंजय मुंडेंच्या कोणत्या प्रकरणाकडे आहे हे लक्षात येते. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले होते.

धनंजय मुंडे काय म्हणाले होते?

धनंजय मुंडेंचं सविस्तर वक्तव्य

भाजपच्या अंगातला माज अजूनही गेलेला नाही, होत्याच नव्हतं नव्हत्याचं केलं तरी भल्या भल्यांच्या मागे इन्कम टॅक्स काय ईडी काय सुरु आहे. ईडीची तर इज्जत ठेवली नाही ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडी तिची किंमत जास्त आहे. त्यांना वाटतंय की आम्ही यांना झुकवू शकतो. भाजपची खरी जिरवायची असेल तर जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष दाखवून द्या. पुन्हा म्हणून भाजप कधीही महाराष्ट्राच्या मातीत अशा प्रकारचा नाद करणार नाही, असा विश्वास असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.