निलेश साबळेंनी मागितली नारायण राणेंची माफी, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात नेमकं काय घडलं ?

झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय आणि आवडीने पाहिला जाणारा चाला हवा येऊ द्या हा मराठी शो सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या शोमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पात्र दाखवण्यात आल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय. राणे समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

निलेश साबळेंनी मागितली नारायण राणेंची माफी, 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात नेमकं काय घडलं ?
narayan rane nilesh sable
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 12:09 AM

मुंबई : झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय आणि आवडीने पाहिला जाणारा चाला हवा येऊ द्या हा मराठी शो सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या शोमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पात्र दाखवण्यात आल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला गेला. राणे समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळे व त्यांच्या टीमने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत दिलगिरी व्यक्त केली.

नेमकं काय घडलं ?

‘चला हवा येऊ द्या’ चे सूत्रसंचालक निलेश साबळे आणि टीमने आज (23 नोव्हेंबर) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. झी टीव्ही वर नुकत्याच झालेल्या ‘दिवाळी अधिवेशन’ या कार्यक्रमात राणे यांचे हुबेहूब पात्र दाखविण्यात आले होते. या पात्रावर राणे समर्थकांनी आक्षेप नोंदविला होता. अनेक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. परिणामी राणे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी झी टीव्ही आणि साबळे यांना फोन करून संताप व्यक्त केला होता. त्यामुळे आज साबळे व टीमने राणे यांची भेट घेतली. त्यांनी राणे यांच्या अधिश या निवासस्थानी जात दिलगिरी व्यक्त केली. यावेळी आमदार नितेश राणेदेखील उपस्थित होते.

चूक पुन्हा होणार नाही

नारायण राणे ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे रसिक प्रेक्षक आहेत. त्यांनी कलाकारांचा नेहमी सन्मान केला आहे. अशावेळी एखादी व्यक्तिरेखा साकारताना कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. परत अशी चूक होणार नाही. असे निलेश साबळे यांनी यावेळी सांगितले.

चला हवा येऊ द्याची महाराष्ट्रात क्रेझ

दरम्यान, चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमाचे पूर्ण महाराष्ट्रभर चाहते आहेत. या कार्यक्रमात साकारण्यात आलेली पात्रे नंतर कित्येक महिने लोकांच्या स्मरणात राहतात. लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंतच्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाचे वेड आहे. मात्र सध्या नारायण राणे यांचे पात्र चुकीच्या पद्धतीने साकारण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती. आता साबळे यांनी माफी आहे.

इतर बातम्या :

‘मोदी सहजासहजी माघार घेणारे नाहीत, माफी मागितली म्हणजे त्यांचा होमवर्क झालेला होता’, जयंत पाटलांचा खोचक टोला

Breaking : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता, शरद पवारांच्या अनिल परबांना कोणत्या महत्वाच्या सूचना?

ST Workers Strike : अंतरिम पगारवाढीचा पर्याय मान्य होईल? पडळकर आणि खोत एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.