Nisarga Cyclone | 3 जून दुपारी अलिबाग ते वरळी, 4 जून मध्यरात्री 2 वणी ते शिरपूर, धुळे मार्गे मध्य प्रदेश
चक्रीवादळ महाराष्ट्रातून कोणत्या वेळी, किती तीव्रतेने आणि दिशेनुसार मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे, याबाबत हवामान विभागाकडून माहिती जारी करण्यात आली आहे (Nisarga Cyclone way).
मुंबई : कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने (Nisarga Cyclone way) महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 3 जून रोजी चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, चक्रीवादळ महाराष्ट्रातून कोणत्या वेळी, किती तीव्रतेने आणि दिशेनुसार मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे, याबाबत हवामान विभागाकडून माहिती जारी करण्यात आली आहे (Nisarga Cyclone way).
निसर्ग चक्रीवादळ 3 जूनपासून 6 जूनपर्यत भारतीय भूमीवर असेल, असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर ते नेपाळमध्ये प्रवेश करेल. यापैकी 3 जून ते 4 जूनपर्यंत चक्रीवादळ महाराष्ट्रात घोंघावणार आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी 2 जूनपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
चक्रीवादळाचा मार्ग कसा असेल?
3 जून दुपारी 4 वाजेच्या सुमारास : चक्रीवादळ अलिबाग येथून मुंबई किनारपट्टीवर, त्यानंतर वरळीमार्गे ठाण्याच्या दिशेला मार्गक्रमण करेल. 3 जून रात्री 8 वाजेच्या सुमारास : ठाणे पाचवड येथून भिवंडी, उम्बरपाडा, वाडामार्गे इगतपुरीच्या दिशेला मार्गक्रमण करेल. 4 जून पहाटे 1 वाजेच्या सुमारास : चक्रीवादळ खोडाला, इगतपुरी येथून त्रिंबकेश्वर, हरसुल, कपराडामार्गे वणीकडे मार्गक्रमण करेल 4 जून पहाटे 2 वाजेच्या सुमारास : वणी, सापुतारा येथून अभोणा, कळवण, सटाणा, नामपूरला मार्गे साक्रीला धडकणार 4 जून पहाटे 4 वाजेच्या सुमारास : साक्री म्हसदी येथून लामकानी, चिमठाणेमार्गे वर्शीला धडकणार 4 जून सकाळी 8 वाजेच्या सुमारास : वर्शी, थाळनेर येथून लामकानी, चिमठाणेमार्गे शिंदखेड्याला धडकणार 4 जून सकाळी 9 वाजेच्या सुमारास : शिंदखेडा, जैतपूर येथून शिरपूरमार्गे धुळे येथे धडकणार 4 जून सकाळी 10 वाजेच्या सुमारास : खरगोणला धडकणार (मध्य प्रदेश)
Deep Depression to intensify into Cyclonic Storm during next 6 hours. To cross north Maharashtra and adjoining south Gujarat coast between Harihareshwar and Daman, close to Alibag (Raigad District, Maharashtra) during the afternoon of 03rd June. https://t.co/rXRAo26pyF pic.twitter.com/lOJUD8FMFP
— IMD Weather (@IMDWeather) June 2, 2020
Depression over eastcentral Arabian intensified into Deep Depression .To intensify further into into a Cyclonic Storm in next 12 hrs and into a Severe Cyclonic Storm in subsequent 12 hrs and cross north Maharashtra and adjoining south Gujarat coast in afternoon of 03rd June. pic.twitter.com/ePU9HuEb5S
— India Met. Dept. (@Indiametdept) June 2, 2020
संबंधित बातम्या :
Nisarga Cyclone | शंभर वर्षात पहिल्यांदाच मुंबईत चक्रीवादळाची शक्यता, काय आहे निसर्ग चक्रीवादळ?
Cyclone Nisarga | चक्रीवादळ मुंबई-कोकणाच्या उंबरठ्यावर, राज्य सरकारकडून काय काय तयारी?
Cyclone Nisarga | चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे 15 मंत्र
चक्रीवादळाचा संभाव्य धोका, मुंबईकरांसाठी महापालिकेच्या महत्त्वाच्या सूचना