महाविकास आघाडीतील आमदारांनी राजीनामे दिल्यास आरक्षण देणे भाग पडेल, नितेश राणेंचा टोला
तसेच राज्य शासनाने देऊ केलेले ईडब्ल्यूएस प्रवर्गातील आरक्षण केंद्र शासनाचा निर्णय असल्याचे आमदार नितेश राणे यांनी अधोरेखित केले. nitesh rane thackeray government maratha reservation
धुळे: महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. आरक्षणाच्या भीतीपोटी राज्य शासनाने लॉकडाऊन 16 जूनपर्यंत वाढवला. महाविकास आघाडीतील आमदारांनी राजीनामे दिले, तर शासनाला आरक्षण देणे भाग पडेल, असं भाजपचे आमदार नितेश राणे म्हणालेत. तसेच राज्य शासनाने देऊ केलेले ईडब्ल्यूएस प्रवर्गातील आरक्षण केंद्र शासनाचा निर्णय असल्याचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी अधोरेखित केले. (Nitesh Rane Criticism On Thackeray Government Maratha Reservation Issue)
महाविकास आघाडी चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची फसवणूक
आमदार नितेश राणे धुळ्यात पत्रकारांशी बोलत होते. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांची बैठक झाली, त्यानंतरही आमदार नितेश राणे यांनी भूमिका स्पष्ट केली. या वेळी खासदार डॉ . सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, महापौर चंद्रकांत सोनार आदी उपस्थित होते . आमदार नितेश राणे म्हणाले की, महाविकास आघाडी चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची फसवणूक करत आहे, महाविकास आघाडीने आरक्षणाच्या प्रश्नाचा खून केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
त्यात कोणी तिसऱ्याने हस्तक्षेप अथवा बोलण्याची गरज नाही
संभाजीराजे छत्रपती आरक्षणासाठी राज्यभर फिरत आहेत. आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. त्यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका नाही. मी आज धुळ्यात तर संभाजीराजे छत्रपती सिंधुदुर्गात आहेत. एवढा आमच्यातील गोडवा आहे. त्यात कोणी तिसऱ्याने हस्तक्षेप अथवा बोलण्याची गरज नाही, असेही नितेश राणे म्हणाले. महाविकास आघाडी चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
गायकवाड समितीने केलेल्या शिफारशीतील मुद्दे मांडले गेले नाहीत
सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल झाल्यावर महाविकास आघाडी शासन आरक्षणविषयीची भूमिका मांडण्यास कमी पडले. गायकवाड समितीने केलेल्या शिफारशीतील मुद्दे मांडले गेले नाहीत. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण सरसकट नाकारले गेले. आता मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे आकडे कमी झाले आहे. परंतु आरक्षण नाकारल्यामुळे महाविकास आघाडीमधील मंत्र्यांना राज्यात फिरता येणार नाही. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन 16 जूनपर्यंत वाढविला आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.
संबंधित बातम्या :
मोदी संवेदनशील, पण मी विरोधी पक्षनेत्यासारखं वैफल्यग्रस्त नाही, उद्धव ठाकरेंचा जहरी वार
nitesh rane criticism on thackeray government maratha reservation issue