AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको, नितेश राणेंचं शिक्षणमंत्र्यांना पत्र

बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको, अशी मागणी करणारे पत्र मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसेंना दिले आहे.

बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको, नितेश राणेंचं शिक्षणमंत्र्यांना पत्र
nitesh rane burkha
Follow us
| Updated on: Jan 29, 2025 | 4:29 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 11 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरु होणार आहे. तर येत्या 21 फेब्रुवारीपासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. या परीक्षांचं वेळापत्रक, हॉलतिकीट आणि परीक्षा केंद्र अशी सर्व तयारी करण्यात आली आहे. त्यातच आता मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी एक मोठी मागणी केली आहे. बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. त्यांनी याबद्दलचे एक पत्र शिक्षणमंत्री दादा भुसेंना लिहिले आहे.

नितेश राणेंनी लिहिलेल्या पत्रात काय?

इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेस परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी, तसेच परीक्षेच्या वेळी आवश्यकता वाटल्यास तपासणीसाठी महिला पोलीस अधिकारी किंवा शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी, असे शासन स्तरावरुन कळवण्यात आले आहे.

इयत्ता 10 व 12 वी परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा आहेत. यावर विद्यार्थ्यांचे संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. ही परीक्षा पारदर्शकपणे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार जसे कॉपी मुक्त परीक्षा होणे अपेक्षित आहे. यासाठी शासन स्तरावरुन वेळोवेळी सूचना दिल्या जातात. जर परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला तर एखादी परीक्षार्थी बुरखा घालून इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा उपयोग करुन परीक्षा देत आहे किंवा नाही हे तपासणे शक्य होत नाही. आकस्मिक प्रसंगी काही आक्षेप उद्भवल्यास सामाजिक तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागेल.

राज्यातील इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी च्या परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्याकरीता तातडीने कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना योग्य ते आदेश द्यावे, अशी विनंती नितेश राणे यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना हे पत्र लिहिले आहे.

लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी

  • उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – मंगळवार, दि. 11 फेब्रुवारी 2025 ते मंगळवार, दि 18 मार्च 2025
  • प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – शुक्रवार, दि. 24 जानेवारी 2015 ते सोमवार, 10 फेब्रुवारी 2025
  • माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा – शुक्रवार, दि. 21 फेब्रुवारी 2025 ते सोमवार दि 17 मार्च, 2025
  • प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – सोमवार, 03 फेब्रुवारी 2025 ते गुरूवार 20 फेब्रुवारी 2025
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.